दौंड
यवत पोलिस स्टेशनकडील १६ गुन्ह्यातील फरार आरोपीला ट्रान्सफॉर्मर डीपी चोरी करणाऱ्या टोळीसह जेरबंद करण्यात
यवत पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत २ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २५/०१/२०२२ रोजी रात्रौ ११:०० वाजण्याच्या पूर्वी खुटबाव (ता. दौंड जि. पुणे) येथील शेत जमीन गट नं.३४८ मधील प्रताप काळभोर यांचे शेतात असलेली डीपी कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्ट्रक्चरवरून नट बोल्ट खोलून खाली पाडून त्यातील ऑइल सांडून नुकसान करून त्यातील अंदाजे एकूण १०० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरून नेले बाबत यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. दिनांक २९/०१/२०२२ रोजी यवत पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार निलेश कदम व गुरुनाथ गायकवाड यांना यवत पोलीस स्टेशन हद्दीतील डीपी चोरणारे संशयित राहू येथे येणार असलेची खात्रीशीर माहिती मिळालेने सदर पोलीस पथकाने गुन्हे शोध पथकातील पोलीस स्टाफसह राहू येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सापळा लावला होता. यावेळी एक संशयित मोटार सायकलवर तीन इसम राहू येथील लक्ष्मीआई मंदिराजवळ आले त्यावेळी यवत गुन्हे शोधपथकाने त्यांना मोटारसायकलसह ताब्यात घेत विचारपूस केली असता सदर संशयित इसमांनी त्यांचे इतर साथीदारांचे मदतीने पाटस, कासुर्डी, बोरीभडक, खुटबाव, उंडवडी, कोरेगाव भीवर असे यवत पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण १२ रोहित्र (डीपी) चोरीचे गुन्हे केलेचे सांगितले.
यामध्ये १) अर्जुन दिलीप बर्डे (वय २० रा राहूरी रेल्वे स्टेशन झोपडपट्टी ता.राहुरी जि.अ.नगर स.रा वाडे बोलाई ता हवेली जि पुणे) २) विकास गौतम बनसोडे (वय २३ रा.नानगाव ता.दौंड जि.पुणे) ३) पांडुरंग ऊर्फ भावड्या मोहन गायकवाड (वय २३ रा.वडगाव रासाई ता.शिरूर जि.पुणे) यांना सदर गुन्ह्याचे कामी अटक करण्यात आली असून त्यांनी डीपी चोरीतील तांब्याच्या तारा ह्या ४) लईक ऊर्फ लाला मोहम्मद अमीन मणियार (वय २१ रा चिखली ता हवेली जि पुणे मु.रा गोंडा उत्तर प्रदेश) यास विकल्याने त्यास सदर गुन्ह्याचे कामे अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या तांब्याच्या तारेचे वितळून तयार केलेले एकूण ३०० किलो वजनाचे त्रिकोणी आकाराचे तांब्याचे ठोकळे कि.रु १,५०,०००/- व आरोपी अर्जुन बर्डे याने गुन्ह्यात वापरलेली पॅशन मोटारसायकल सह कि.रु २,१०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व त्यांचे इतर ५ साथीदार निष्पन्न करण्यात आले आहेत.
सदर आरोपींना मा.जेएमएफसी कोर्ट दौंड यांनी ४ दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली असून वरील आरोपींकडून यवत पोलीस स्टेशन कडील एकूण रोहित्र चोरीचे खालीलप्रमाणे १२ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
१)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.१०२/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
२)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.२१/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
३)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.३२/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
४)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.३३/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
५)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.८४/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
६)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.११२/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
७)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.१२७/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
८)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.१४३/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
९)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.२५१/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
१०)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.३६७/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
११)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.३८३/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
१२)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.४३६/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७ असे एकूण १२ रोहित्र (डीपी) चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून आरोपींकडून वरीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस,पोलीस निरीक्षक अशोक शेळके स्था .गु शा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोसई संजय नागरगोजे, पो.हवा.निलेश कदम, पो. हवा.गुरू गायकवाड, पो. ना.अक्षय यादव, पो.ना. उमेश गायकवाड, पो. शि. तात्या करे, पो.हवा.सचिन घाडगे स्थानिक गुन्हे शाखा, पो. हवा.अजित भुजबळ, पो.ना. अजय घुले, पोलिस मित्र नीलेश चव्हाण यांनी केलेली आहे.