Categories: क्राईम

यमुना वे वर ट्रक आणि बोलेरोचा भीषण अपघात, बारामतीच्या 5 जणांचा जागीच मृत्यू

नवी दिल्ली :

उत्तर प्रदेशमधील यमुना एक्स्प्रेस वे वर गुरुवारी पहाटे ट्रक आणि बोलेरोमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये बारामतीच्या 4 महिला आणि एक पुरुष असा 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

गुरुवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे.
ट्रक आणि बोलेरो गाडीचा अपघात झाल्यानंतर लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्ण्यालयात दाखल केले. तसेच यावेळी पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी यातील 5 जणांना मृत घोषित केले. तर जखमी व्यक्तींवर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती मात्र अजूनही चिंताजनक आहे.

या अपघातामध्ये चंद्रकांत बोराडे, स्वर्णा बोराडे, मालन कुंभार, रंजना पवार आणि नूरजान मुजावर यांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांवर उपचार सुरु आहेत.
अपघातग्रस्त व्यक्ती बारामतीच्या असून हा अपघात वाहन चालकाला झोप लागल्याने झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

11 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

12 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

14 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago