Categories: राजकीय

भाई, काळजी घ्या! बादशहा शेख यांना खा.सुप्रिया सुळे यांचा सल्ला

अख्तर काझी

दौंड : प्रशासकीय आढावा बैठकीच्या निमित्ताने दौंड शहरात आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरपालिकेतील मा. गटनेते बादशाहा शेख यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली, आणि तब्येतीबाबत काळजी घेण्याचा सल्ला दिला.

बादशहा शेख यांची विचारपूस करताना खा.सुप्रिया सुळे

मध्यंतरी बादशाह शेख यांना अपघात होऊन त्यांच्या पायाचे हाड मोडले आहे, डॉक्टरांनी त्यांना घरीच विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे. मागे शहरात झालेल्या एका कार्यकर्ता मेळाव्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि बादशाह शेख यांच्यामध्ये काही विषयांवरून वाद झालेला होता,त्यावेळी बादशाह शेख यांच्या वक्तव्यावरून खासदार सुळे फारच संतापलेल्या होत्या आणि त्यांनी तसा रागही मेळाव्यामध्ये व्यक्त केला होता. खासदार सुळे यांच्याकडून आपणाला अपमानास्पद वागणूक मिळाली आहे असा आरोप करीत बादशाह शेख यांनी पत्रकार परिषद घेत आपली नाराजी व्यक्त केली होती. या घटनेनंतर बादशाह शेख राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

परंतु मा.आमदार रमेश थोरात आणि मा. जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी बादशाह शेख यांची भेट घेत खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील त्यांची नाराजी दूर केली होती. त्यामुळे आज खासदार सुप्रिया सुळे दौंड शहरात आल्यानंतर बादशाह शेख यांची भेट घेतात की नाही याची सर्वांना उत्सुकता होती. परंतु आपली सर्व नाराजी बाजूला ठेवून खासदार सुप्रिया सुळे यांनी बादशाह शेख यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीबाबतची विचारपूस केली व काळजी घेण्याचा सल्ला दिला.

यावेळी पक्षाचे मा.आमदार रमेश थोरात, आप्पासो पवार,सोहेल खान, वीरधवल जगदाळे, गुरुमुख नारंग आदि उपस्थित होते.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

19 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago