Categories: Previos News

मराठा समाजाला ‘आरक्षण’ ! पण ‘आरक्षण’ ‘कुणाला’ मिळणार आणि काय आहेत अटी..

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्यात आले अशी माहिती सर्वत्र देण्यात येत आहे. मात्र यात नेमके आरक्षण कुणाला आणि कश्या पद्धतीने देण्यात येणार आहे याचा मागोवा सहकारनामा ने घेतला आहे. तर प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली आहे.

आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जारंगे-पाटील यांनी ‘निजामकालीन महसुली रेकॉर्ड’ तपासून याठिकाणी पूर्वी जे कुणबी म्हणून नोंदणीकृत होते त्यांना मान्यता’ देण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने ही समिती स्थापन करण्यात येत असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

ही समिती महसुली, शैक्षणिक व संबंधित नोंदी तपासून मागणीनुसार निजामकालीन ‘कुणबी’ नोंद असणाऱ्या मराठा समाजास ‘कुणबी’ दाखले देण्याकरिता अशा प्रकरणांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करणे व त्याबाबतची कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करेल. याबाबत समिती अहवाल तयार करून तो एक महिन्यात शासनास सादर करेल.

निवृत्त न्यायाधीश न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, तसेच संबंधित सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सदस्य म्हणून काम पाहतील. तसेच औरंगाबादचे (छत्रपती संभाजी नगर) विभागीय आयुक्त समितीचे सदस्य सचिव असतील. यापूर्वीची महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समिती देखील या समितीस पूरक माहिती देण्याचे काम करेल असे जाहीर करण्यात आले आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

3 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

3 दिवस ago

रेल्वे रुळावर दगड ठेवून घातपात घडवून आणणाऱ्या दोन सराईतांना अटक, 26 वर्षापासून पोलिसांना देत होते गुंगारा

रेल्वे रुळावर दगड ठेवून घातपात घडवून आणणाऱ्या दोन सराईतांना अटक, 26 वर्षापासून पोलिसांना देत होते…

4 दिवस ago