अख्तर काझी


दौंड : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अनिल मिश्रा याने वादग्रस्त वक्तव्य केले तसेच देशाचे सर न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोर याने बूट फेकून मारला या दोन्ही संतापजनक घटनेचा दौंड शहर व तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. दोन्ही घटनांच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला व शहरातील संविधान स्तंभ परिसरात मोर्चाची सांगता करण्यात आली.
यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून पोलीस प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात आले. पक्षाचे पदाधिकारी रवी कांबळे, सतीश थोरात, प्रकाश भालेराव, रोहित कांबळे, अजय गायकवाड, कैलास कांबळे, सतीश गायकवाड, मंगेश जगताप, तेजस कांबळे, विश्वास चितारे, साहेबराव पोळ तसेच आंदोलनाला पाठिंबा देणारे शहरातील संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अनिल मिश्रा याने वादग्रस्त वक्तव्य केल्याने तसेच देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर याने बूट फेकून भ्याड हल्ला केला, या घटना अत्यंत निंदनीय व राष्ट्रपुरुषांचा अपमान करणाऱ्याआहेत या घटनांचा पक्षाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. समाजातील अशा माथेफिरू लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.







