दौंड : दौंड तालुक्यातील यवत येथे असणाऱ्या बडे शाह वली बाबा दर्गातील मदरश्यामध्ये ध्वजारोहन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे मौलाना एजाज अहमद मिस्बाहि (यवत) यांनी ध्वजारोहन करत एकता आणि बंधुता यावर आपले मनोगत व्यक्त केले. मौलाना गुलाम गौस मदनी प्रिन्सिपल,जामिया (यवत) मौलाना शफिक मदनी, कारी राशीद इकबाल हे यावेळी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त दावते इस्लामी इंडिया संचालित शाळा आणि मदरशांमध्ये ध्वजावंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचा मुख्य उद्देश येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच सामान्य लोकांमध्ये संविधानावरील विश्वासाची भावना वाढवणे तसेच त्यांना भारतीय संविधानानुसार जीवन जगण्याची प्रेरणा मिळावी हा होता.
या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वज फडकावून तिरंग्याला सलामी देत राष्ट्रगीताने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी देशसेवा करण्याची आणि शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती करण्याचा प्रण घेतला. नाशिक च्या वडाला येथे दावते इस्लामी इंडिया अंतर्गत चालणाऱ्या दारुल मदिना इंग्लिश स्कूल आणि जमियतुल मदिना यांच्या सर्व शाखांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये दावते इस्लामी इंडियाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आपापल्या शहरातील या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे सय्यद आरिफअली अत्तारी (अध्यक्ष, दावते इस्लामी इंडिया) यांनी ध्वजारोहण करून शहरातील वडाळा येथील दावते इस्लामी अंतर्गत संचालित दारूल मदिना इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात एकता व बंधुतेचा संदेश दिला.
यावेळी सय्यद शादाब कादरी, वकार अटारी, सलीम तांबोळी, सादिक रहेमानी आदी मान्यवर उपस्थित होते.