Categories: Previos News

Remdesivir : रेमडेसिव्‍हिर इंजेक्शन त्वरित उपलब्ध करून देण्याची आ.राहुल कुल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

– सहकारनामा

पुणे : 

राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वच ठिकाणी पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी मोठी लाट आल्याची लक्षणे दिसत आहे. मात्र अशा वेळी कोरोना विषाणूंना प्रतिबंध करण्याऱ्या लसींचाही तुटवडा जाणवत आहे. 

पुणे शहर व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना रेमडेसिव्‍हिर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे, रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक ठिकाणी हेलपाटे मारून ८ ते १० तास रांगेत उभे राहून देखील रेमडेसिव्‍हिर इंजेक्शन मिळत नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

रेमडेसिव्‍हिर औषधाचा तुटवडा दूर करून पुरवठा सुरळीत व्हावा, कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिव्‍हिर व तत्सम औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही व्हावी अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

8 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

22 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

23 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago