– सहकारनामा
पुणे :
राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वच ठिकाणी पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी मोठी लाट आल्याची लक्षणे दिसत आहे. मात्र अशा वेळी कोरोना विषाणूंना प्रतिबंध करण्याऱ्या लसींचाही तुटवडा जाणवत आहे.
पुणे शहर व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे, रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक ठिकाणी हेलपाटे मारून ८ ते १० तास रांगेत उभे राहून देखील रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रेमडेसिव्हिर औषधाचा तुटवडा दूर करून पुरवठा सुरळीत व्हावा, कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिव्हिर व तत्सम औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही व्हावी अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.