Religious : वाल्हे येथील शिवमंदिरात फुलांची सजावट



वाल्हे : सहकारनामा ऑनलाईन (सिकंदर नदाफ)




श्रावण महिन्यात देऊळ बंद असताना वाल्हे येथील शिवमंदिरात व्यवस्थापनातर्फे शासकीय नियमांचे पालन करत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा रुद्राभिषेक व रुद्र पठण सेवा संपन्न झाली.

यावेळी मंदिरात नयन मनोहारी फुलांची सजावट तसेच रांगोळी देखील काढण्यात आल्याने भक्तगणात आनंदाचे वातावरण होते.

यावेळी  मंदिरातील पुजारी सचिन आगलावे आणि व्यवस्थापनातील मोजके सेवेकरी व पदाधिकाऱ्यांनी फिजिकल डीस्टन्स पाळून रुद्र पठण केले तर पिंडीवर अभिषेक व बेल फुल वाहून शंभू महादेवाच्या दर्शनाचा लाभ देखील घेतला.

दरम्यान भक्तगणांसह एकता मित्र मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी चिक्की व केळी चे वाटप करत शेवटचा श्रावणी सोमवार भक्तिमय वातावरणात साजरा केला.