हिवाळी अधिवेशन
नागपूर : दौंडचे आमदार राहुल कूल यांनी आज पुणे परिसरातील शेती व शेतकऱ्यांशी निगडित विविध विषय लक्षवेधी द्वारे विधानसभेमध्ये उपस्थित केले. त्यामध्ये खडकवासला धरण साखळीतून पुणे महानगरपालिकेद्वारे मंजूर ११.५ टिमसी कोट्याहुन अधिक पाणी वापर होत असल्याने सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यावर मर्यादा येत असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे मत त्यांनी मांडले. व पुणे महानगर पालिकेद्वारे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी होई पर्यंत शेतीच्या सिंचनासाठी काही अत्यावश्यक उपायोजना तातडीने करण्यात याव्यात असे सुचवले.
ज्यामध्ये, खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यामधून पाणी नेण्याच्या प्रकल्प तातडीने हाती घेण्यात यावा, जुना मुठा उजवा (बेबी कॅनॉल ) , नवीन मुठा उजवा कालव्याची विस्तार, सुधारणा व अस्तरीकरणाच्या प्रस्तावित कामांना तातडीने मान्यता देऊन हि सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी सुधारित प्रस्तावास मान्यता देण्यात यावी, तसेच जलसिंचनामुळे चिबड, पाणथळ व क्षारयुक्त जमिनींचे प्रमाण वाढले असून चिबाड जमीन निर्मूलन कार्यक्रम साठी १० टक्के लोकवर्गणीची अट रद्द करावी अशी मागणी त्यांनी विधानसभेमध्ये केली.
आ.कूल यांनी केलेल्या सर्व मागण्यांवर लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच यात जे जे काही करता येईल ते करु असे यावेळी आश्वस्त केले.