|सहकारनामा|
दौंड : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आज संघटनेसहित दूध उत्पादकांचा राज्यव्यापी आंदोलनाचा दिवस होता.
या आंदोलनात रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे, जिल्हा सरचिटणीस सयाजी मोरे, शेतकरी संतोष गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत धोंडीबा गायकवाड, नंदकुमार रामभाऊ गवळी,सोमनाथ बाळासाहेब कोलते, पांडुरंग अण्णा गायकवाड, रामभाऊ गायकवाड, विठ्ठल बापुराव गवळी. तात्यासो गावडे, तुकाराम गायकवाड, अण्णा मारुती गायकवाड, स्वप्नील शिवाजी गवळी, गौरव दिलीप गवळी, दत्तात्रय गावडे, हनुमंत गायकवाड, साहेबराव गावडे, प्रवीण गवळी, महादेव गायकवाड, सचिन कोलते,दादासो गवळी, अनिल गवळी इत्यादी दूध उत्पादकांनी आंदोलनात सहभाग घेतला. दूध उत्पादक शेतकरी संतोष गायकवाड यांच्या गुरांच्या गोठ्यामध्ये महाविकास आघाडी सरकारचा प्रतीकात्मक पुतळा तयार करून त्याच्यासमोर राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी दुधाने अंघोळ करून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.
राज्यामध्ये रोज दोन कोटी लिटर गाईचे व म्हशीचे दूध शेतकरी उत्पादन करतो. परंतु सरकार शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव देत नाही. पाण्यापेक्षाही दूध स्वस्त झाले व पाणी महाग झाले अशी अवस्था दूध उत्पादक शेतकऱ्यांची तयार झाली आहे. एका बाजूला गुरांना लागणारे भुसा पेंड या खाद्याचे दर गगनाला भिडले आहेत दुसऱ्या बाजूला कोरोना अतिवृष्टी महापूर व बाजार भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. अशा अवस्थेत शासनाने शेतकऱ्यांना दिलासा म्हणून गाईच्या दुधाला 30 रुपये व म्हशीच्या दुधाला 60 रुपये प्रति लिटर दूध दर द्यावा अशी प्रमुख मागणी या ठिकाणी करण्यात आली.
दुधापेक्षा पाणी महाग महाविकास आघाडी सरकारला येऊ द्या जाग.. रयत क्रांती संघटनेचा विजय असो शेतकरी एकजुटीचा विजय असो कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहात नाही. दुधाला हमीभाव मिळालाच पाहिजे. अशा प्रकारच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या.
या आंदोलनासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.