दौंड : भांडगाव येथील भाजप चे माजी पदाधिकारी रवींद्र दोरगे यांच्या नेतृत्वाखाली भांडगाव येथील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. पवारांच्या विचारधारेवर विश्वास ठेवत आपण जाहीर प्रवेश करत असल्याचे यावेळी दोरगे यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी आमदार रमेश थोरात यांनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येय-धोरणांवर आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर प्रेरित होऊन गावागावांतील तरुण कार्यकर्ते पक्षात सामील होत आहेत. हा उत्साह आगामी काळात सामाजिक विकासाच्या कार्याला आणखी गती देणारा असेल असे यावेळी थोरात यांनी म्हटले.
रवींद्र दोरगे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत आहे. एकत्र येऊन भविष्यातील विकासाची नवी पाऊलवाट घडवू आणि जनतेच्या प्रश्नांवर ठोस उपाय योजना करू असेही थोरात यांनी यावेळी सांगितले.