Categories: क्राईम

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या युवतीवर बलात्कार, दौंड पोलिसांकडून आरोपीला बेड्या

दौंड : पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या दौंड मधील युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अतुल वामनराव कुतवळ व एक महिला (दोघे रा. आलेगाव, दौंड) यांच्या विरोधात बलात्कार व ॲट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दौंड पोलिसांनी अतुल कुतवळ यास अटक केली आहे.

आरोपी अतुल हा देखील पोलीस भरतीसाठी तयारी करीत होता. यादरम्यान पीडितेची व आरोपीची ओळख झाली. आरोपीने पिडीतेला वारंवार लग्नाचे अमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पिडीतिने लग्नाबाबत विचारणा केली असता, तू मागासवर्गीय समाजाची असल्या कारणाने मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही असे सांगून तिची फसवणूक केल्याने पिडीतेने आरोपी अतुल कुतवळ विरोधात दौंड पोलीस स्टेशनला तक्रार केली.

पोलिसांच्या माहितीनुसार सन 2018 मध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत असताना पीडिता व आरोपी अतुल यांची ओळख झाली. डिसेंबर 2022 मध्ये आरोपीने पीडीतेला लग्नाची मागणी घातली. त्यावेळी तिने, मी मागासवर्गीय समाजाची आहे तू मराठा समाजाचा आहे तुझे घरचे आमचे लग्न होऊ देणार नाही असे सांगितले असता, मी माझ्या घरच्यांना लग्नाबाबत विचारतो असे आरोपीने सांगितले. पिडीतेच्या घरचे लग्नाला तयार झाले, परंतु आरोपीच्या घरच्यांकडून मुलीच्या जातीवरून लग्नाला विरोध झाला. तरीसुद्धा मी माझ्या घरच्यांना तयार करतो असे आरोपीकडून सांगितले गेले.

त्यानंतर दिनांक 18/1/2023 रोजी पीडिता पालघर येथे पोलीस भरतीच्या ग्राउंड( मैदानी चाचणी) साठी गेली असता, आरोपी तिच्यासोबत होता. पीडिता पहाटेच्या वेळेस अंघोळीसाठी गेली असता आरोपी त्या ठिकाणी आला आणि तिथे असलेल्या खोलीच्या शेजारील जागेत त्याने पिडीते बरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या घटनेनंतर तू पोलीस भरती हो मग आपण दोघे लग्न करू असे आरोपीने तीला सांगितले.
दि.14/2/2023 रोजी आरोपीने दुसऱ्याच मुलीशी साखरपुडा केला असल्याची माहिती पीडितेला कळाली, याचा जाब विचारण्यासाठी पिडीताआरोपीच्या घरी गेली. आरोपी घरी नव्हता तो रात्री उशिरा घरी आला त्यामुळे पिडीतेने त्याच्याच घरी मुक्काम केला. तो घरी येताच तिने त्याला तू दुसऱ्या मुलीबरोबर साखरपुडा का केला अशी विचारणा केली. तेव्हा तू मागासवर्गीय असल्याने मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही व माझे घरचेही आपल्या लग्नाला तयार नाहीत असे उत्तर त्यांने दिले. रात्र झाल्याने पिडीता त्याच्याच घरी झोपली. पहाटे 4च्या सुमारास आरोपीने तिला उठवून घराबाहेर आणले व शेजारीच बांधकाम चालू असलेल्या भावाच्या घरात घेऊन गेला. व मी तुझ्याशीच लग्न करणार आहे असे सांगून त्याने पुन्हा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

दि.17/2/2023 रोजी पीडिता पुणे येथे पोलीस भरतीची ग्राउंड परीक्षा देण्यासाठी गेली होती. परीक्षा झाल्यानंतर ती दौंडला निघाली असता आरोपी दुचाकी वर तिथे आला व मी तुला दौंडला सोडतो म्हणून त्याने तिला दुचाकी वर घेतले व दौंडला निघाला. रस्त्यामध्ये उरुळी या गावामध्ये त्याने दुचाकी थांबविली व तुझे ग्राउंड झाले आहे तू हॉटेलला फ्रेश हो म्हणून त्याने तिला एका हॉटेलमध्ये नेले. तेथेही त्याने मी तुझ्याशीच लग्न करणार आहे असे सांगून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पीडिता त्याला वारंवार त्यांच्या लग्नाविषयी विचारत होती. आज नाहीतर उद्या मी तुझ्याशीच लग्न करणार आहे असे सांगून आरोपी पिडीतेला लग्नाचे अमिष देऊन शारीरिक संबंध ठेवत होता. घटनेचा पुढील तपास दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

10 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

12 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

13 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

21 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

2 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

3 दिवस ago