आमदार ‘राहुल कुल’ यांच्या विजयात मोलाचं योगदान दिलेली ‘रणरागिणी’

दौंड (अब्बास शेख) : हिंदीमध्ये एक म्हण आहे ‘हर कामयाब इंसान के पीछे एक औरत का हाथ होता है’ ही म्हण तंतोतंत खरी होताना दौंड तालुक्यातील जनतेने आपल्या डोळ्यांनी पाहिली आहे. दौंडचे भाग्यविधाते दिवंगत आमदार स्वर्गीय सुभाष आण्णा कुल यांच्या आकस्मिक निधनानंतर श्रीमती रंजनाताई कुल यांनी त्यांचे पुत्र राहुल कुल यांना साथ दिली आणि त्याच्या कित्येक पटीत राहुल कुल यांनीही आपल्या आईला जपले. मात्र त्यानंतरच्या काळात राहुल कुल यांच्या आयुष्यात आलेल्या कांचनताई कुल यांनी आपल्या वेगळ्या शैलीने आ.राहुल कुल आणि कुल परिवारच नव्हे तर संपूर्ण दौंडकरांची मने जिंकली आहेत आणि याचाच प्रत्यय आपल्याला पुढील काही घटनांमूळे नक्कीच येईल.

दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांचा काल मोठ्या फरकाने विजय झाला. यात अनेकांचं योगदान आहे मात्र या विजयात मोठा वाटा हा त्यांच्या पत्नी कांचन कुल यांचा असल्याचेही येथे नमूद करावेसे वाटते. कारण तालुक्यातील प्रत्येक गावात असणाऱ्या लाडक्या बहिणीपर्यंत कांचनताई यांनी पोहचून राहुल कुल यांनी केलेली कामे आणि भविष्यात होणारी कामे त्यांना सांगितली. तसेच लाडकी बहीण योजना ही निवडणुकांपूर्ती नसून ती या पुढेही जोमाने सुरु राहिल हेही लाडक्या बहिणींना पटवून दिले त्यामुळे तालुक्यातील ‘लाडक्या बहिणींना’ ‘लाडक्या वहिनींनी’ सांगितलेली ही बाब आवडली आणि त्यांनी मतदानातून पुन्हा एकदा आपल्या ‘लाडक्या भावाला’ निवडून देण्यात मोलाचे योगदान दिले.

कांचनताई यांचा थक्क करणारा दररोजचा दिनक्रम – कांचनताई कुल यांनी फक्त निवडणुकीपुरतेच नव्हे तर निवडणूक झाल्यानंतरही लोकांना, रुग्णांना जाऊन भेटणे सुरूच ठेवले होते त्यामुळे कुल कुटुंब हे फक्त निवडणुकीपुरते घराबाहेर पडत नाही तर कायम जनतेची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या सुख दुःखात सामिल होण्यासाठी सर्वात पुढे असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

निवडणूक संपताच व्हायरल इन्फेक्शन ने आजारी पडलेल्या आपली छोटी लाडकी मैत्रिण अमरीन शेख आणि इतर रुग्णांना भेटायला दवाखान्यात पोहोचल्या कांचनताई कुल

प्रणित दोरगे याने सांगितला त्या दिवशीचा घटनाक्रम – दिनांक-9/11/2024
आमदार राहुल कुल यांची ओळख पुणे जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आरोग्यदूत, पाणीदार आमदार , विकासपुरुष म्हणून झाली आहे , दादा खूप काम करत असतात त्यासाठी कायम दौंड पुणे मुंबई दिल्ली दौरा चालू असतो. या दरम्यान एक अदृश्य शक्ती कायम च आपल्या तालुक्यात काम करत असते, ती शक्ती म्हणजे आदरणीय कांचनताई कुल.

कालचा दिवस, सकाळी 8 वाजता आपल्या 4, 5 वर्षाच्या मुलीला घरी ठेऊन ताई यवत गावात पोहचल्या, 8:30 वाजता ताईंनी पूर्ण गावात दौरा चालू केला. दौरा मोठा होता त्यामुळे अक्षरशः कार्यकर्ते थकायला लागले मात्र थकतील त्या ताई कसल्या.. थोरा-मोठ्यांचा आशिर्वाद घेत ताईंनी दुपारपर्यंत पूर्ण गाव पिंजून काढलं… कार्यकर्ते थकले, ताईंनी कार्यकर्त्यांना जेवायला वेळ देऊन तोपर्यंत स्वतः भेटी गाठी द्यायला निघून गेल्या… साधा एक अन्नाचा कण पोटात नाही, ना चहा, ना कॉफी. असच बिना अन्न पाण्याचं ताईंनी 4 वाजेपर्यंत पूर्ण चालत प्रवास केला. सर्वजण आग्रह करत होते, ‘ताई बसं झालं’ राहिलेल्या वाड्या वस्त्या आम्ही घेतो, मात्र ताईंनी ऐकलं नाही आणि म्हणाल्या की मला वाड्यावस्त्यांवर पण फिरायचं आहे, तेथील लोक माझी वाट पाहत आहेत.

कार्यकर्ते थकले ताई त्याच जोशात प्रचार करत होत्या अश्यातच ताईंनी जे दोरगे वाडीवर भाषण केलं ना, अगदी मीच काय पूर्ण तालुक्याने अस ताईंना ऐकलं नसेल आणि कार्यकर्त्यांच्यात पुन्हा एकदा नवीन जोश संचारला.. कधी चालता चालता त्या अडखळल्या, फक्त पाण्यावर रात्री 9:30 पर्यंत प्रचार केला. त्याच काळात पुन्हा खुपटे वस्तीवर 7 वाजल्यापासून थांबलेल्या 150 लोकांना ताईंनी ज्या प्रकारे संभाषित केलं ते ऐकून तिथल्या महिला अक्षरशः ताईंच्या गळ्यात पडल्या. दिवसभरात भावनिक व्हायचे खूप क्षण आले पण ताई भावनिक झाल्या नाही. ताईंच एकच म्हणणं होतं भावनिक होऊन मत मागायची आपल्याला गरज नाहीये आपला विकास बोलतोय.

त्यानंतर एक कार्यक्रम अटेंड केला आणि खरच एकच वाक्य आठवलं, या तर खरच आपल्या दौंड तालुक्याच्या रणरागिणी आहेत.. न कळत लोकांकडून दिवसभरात खूप चूका झाल्या पण त्या सर्व चुका त्यांनी पदरात घेतल्या आणि आपसूक एक तोंडात आलेलं वाक्य ताईंना बोललो ‘ताई’ तुमच्याकडे किती धीर आहे. शेवटी ताईंनी सर्वांना आपुलकीने जेवायला घालून एका कार्यकर्त्याला पाटस ला सोडायला जाऊन आम्हाला चौघांना पण गाड्या असून सुद्धा आपापल्या घरी सोडताना ताई सहज बोलून गेल्या.. ‘मायरा’ चे पेपर चालू होणार आहेत जाऊन तिचा अभ्यास घ्यायचा आहे , मायरा चा दिवसभरात कॉल आला नाही बिचारी आता आम्हाला गृहीत धरत नाही.. कारण कोरोना काळात सुद्धा घरात लोक आजारी असताना ताई कोरोना काळात पेशंट ची काळजी घ्यायला रोज कोरोना सेंटर ला उपस्थित असायच्या त्यामुळे आता मुलांनाही सवय झाली आहे.

त्या रात्री 12 वाजता ताई घरी पोहचल्या. मायराचा अभ्यास घेऊन ताई सकाळी तर 8 वाजता पुन्हा दुसऱ्या दिवसाच्या प्रचाराला हजर झाल्या. त्यामुळे दौंड च्या लोकांना वेळ देता देता त्यांना कधी स्वतःच्या कुटुंबाना वेळ देता येत नाही, पण ना ते कधी कोणाला बोलतात ना कधी त्याच भांडवल करतात. अश्या या दादांच्या मागे खंबीर पणे उभ्या असणाऱ्या अदृश्य शक्तीला, आपल्या तालुक्याच्या रणरागिणीला माझा आणि समस्त दौंडकरांचा मानाचा मुजरा