रामगिरी महाराजावर बारामतीत गुन्हा दाखल |  मुस्लिम समाजाच्या संघर्षाला अखेर मिळाला न्याय ! 


बारामती : रामगिरी महाराजाने मुस्लिम धर्मविरोधी व आदर्श इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर साहेबांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मुस्लिम समाजाने मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनाला आता कुठेतरी यश येताना दिसत असून बारामती पोलिस स्टेशनला रामगिरी महाराजाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामगिरी महाराजाने इस्लाम धर्माविषयी व इस्लाम धर्माचे धर्मगुरू, व इस्लाम धर्माचे प्रेषित मोहंमद पैगंबर साहेब यांच्या वरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्या संदर्भात तक्रार दाखल व्हावी म्हणून 23/8/2024 रोजी धरणे आंदोलन सुरू असताना पोलीस प्रशासनाने सायंकाळी 5 वाजता चर्चा करण्यासाठी मुस्लिम समाज प्रतिनिधी यांना आमंत्रित केले होते. या अगोदर बारामती शहर पोलिस स्टेशनला दिनांक 17/8/2024 रोजी चा फैयाज इलाही शेख. (AIMIM) पुणे जिल्हाध्यक्ष यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दिला होता.

त्यात नमुद केल्याप्रमाणे त्यामध्ये फेसबुक अकाउंटवरून पाहिलेला व्हिडिओ ची लिन्क व त्याचा स्क्रीन शॉट गोपनीतेयचे माने यांना त्यांनी पाठवले होते. तसेच दि. 19/8/2024 रोजी अजीज भाई सय्यद (MMYP) शहराध्यक्ष बारामती.यांचा तक्रार अर्ज /निवेदन तहसीलदार व पोलिस स्टेशन ला दिलें गेलेले होतें. 20/8/2024 ला ग्रामीण पोलिस स्टेशनला ग्रामीण भागातील मुस्लिम समाजाने तक्रार तसेच 21/8/2024रोजी मा. तहसीलदार सो. यांना बारामती शहर मुस्लिम समाजा कडून तक्रार /निवेदन कऱण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते व समाजाचे शहर व ग्रामीण असे मिळून 4 तक्रारी FIR दाखल होऊनही प्रशासन गुन्हा दाखल होण्यासाठी देवून ही प्रशासन काहीच कारवाई करत नव्हते. तसेच वारंवार याचा पाठपुरावा बारमाती पोलीस स्टेशनला, ग्रामीण पोलीस स्टेशनला ,तहसीलदार कार्यालयात वेळोवेळी ,वैयक्तिक नावाने, समाजाच्या नावाने दिलेल्या तक्रारीचा FIR दाखल व्हावा म्हणून चालुच होता.

21/08/2024 रोजी पर्यंत महाराष्ट्रात सर्वत्र गुन्हे दाखल होत असतानाही पुरोगामी विचारांच्या बारामतीत काहीच करवाई होत नाही म्हणून बारामतीतील मुस्लिम समाज व आंदोलक प्रशासनावर नाराज होते म्हणूनच त्यांनीं लोकशाही मार्गानें मा.उपविभागीय अधिकारी सो, बारामती तसेच मा उपविभागीय पोलिस अधिकारी सो, बारामती. व पोलिस निरीक्षक बारामती. यांचें नावाने पत्र देवून संविधानिक मार्गाने जो पर्यंत फेसबुक/सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट ची सर्व पुरावे माहिती घेवुन प्रशासन संबंधितावर गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन चालुच ठेवणार असल्याचे आंदोलकांनी ठाम निश्चय करून उपविभागीय अधिकारी कार्यालय प्रशासकीय भवन ,प्रशासकीय इमारत गेट समोर धरणे आंदोलन करणार असल्याबाबत पत्र दिले.

त्यानंतर दिनांक 23/08/2024 रोजी दुपारी दोन वाजल्यापासून धरणे आंदोलन सुरू झाले. त्यानंतर 5 चे सुमारास प्रांत, डी.वाय.एस.पी व पोलिस निरीक्षक बारामती शहर व आंदोलनामध्ये उपस्थित असणारे आंदोलनकर्ते, मुस्लिम धर्माचे धर्मगुरू (मौलाना, मुफ्ती) यांच्याशी प्रांत कार्यालयात चर्चा झाली. या चर्चेची माहिती आंदोलन स्थळी देण्यासाठी समाज प्रतिनिधी व पोलिस निरीक्षक खाली आले. तेथे धरणा देत असेलेले धरणे आंदोलकांमध्ये आंदोलकांना पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी प्रांत कार्यालयात झालेला चर्चेची संपूर्ण माहिती दिली. यासाठी दि.24/08/2024 रोजी मुस्लिम समाज प्रतिनिधी व तक्रार दार फैयाज इलाही शेख. (AIMIM) पुणे जिल्हाध्यक्ष यांचे नावे प्रशासना विरोधात आंदोलन व वेळ पडल्यास गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासना विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे नमुद केलेले निवेदन दिले. त्यानंतर गु.रं.न. 0654 कलम १९२, १९६, १९७, २९९, ३०२, ३५३(२), ३५६(२), ३५६(३) गुन्हा नोंदवला गेला. यासर्व घटना क्रमातून समाजाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र फय्याज  शेख यांनी दिला.