दौंड : बारामती लोकसभा मतदार संघात सध्या मोठी चुरस पहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, ओबीसी पर्व चे महेश भागवत यांसह पुरंदर चे माजी आमदार विजय शिवतारे हे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपापल्या परीने प्रचार सुरु केला असून त्यांच्यावर आता टिकाटिप्पणी होताना दिसत आहे. अशीच टिका ओबीसी पर्वचे इच्छुक उमेदवार महेश भागवत यांच्यावर माजी आमदार रमेश थोरात यांनी केली आहे. महेश भागवत यांची औकात काय असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारत महेश भागवत यांच्यावर टिका केली आहे. याला आता ओबीसी पर्व आणि महेश भागवत कसे उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीसाठी सध्या सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि ओबीसी पर्व चे महेश भागवत हे प्रचारात आघाडीवर असल्याचे दिसत आहे. महेश भागवत यांना राजकारणाचा दांडगा अनुभव असून त्यांना राजकीय वारसाही आहे. ओबीसी पर्व च्या झेंड्याखाली विविध जातीधर्मांचे लोक एकवटताना दिसत असून माळी आणि धनगर समाज त्यांच्यासोबत उभा राहिल्याचे दिसत आहे. नेमका हाच धागा पकडून काही पत्रकारांनी याबाबत माजी आमदार रमेश थोरात यांना प्रश्न विचारला असता महेश भागवत यांची औकात काय अशी टिका रमेश थोरात यांनी केली सर्व राजकीय वातावरण ढवळून निघाले. आता ओबीसी पर्व आणि महेश भागवत त्यांना कसे उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.