Ramesh Thorat Onion shed opening – जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्याहस्ते केडगाव येथे ‛कांदा लिलाव शेड’ चे उदघाटन



|सहकारनामा|

दौंड : दौंड तालुक्यातील शेतकरी कांदा पिकाचे उत्पादन घेत असतात पण तो उत्पादित झालेला कांदा विक्री करण्यासाठी मात्र कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर च्या बाजारात जावं लागतं. यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा खर्च लागत होता. 

ही अडचण लक्षात घेऊन दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या अंतर्गत येत असलेल्या केडगावच्या उपबाजारामध्ये कांदा लिलाव शेड उभं करण्यात आले आहे.  या कांदा लिलाव शेड चे उदघाटन आज जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्याहस्ते करण्यात आले.

चालू हंगामात बाजार समितीने त्या ठिकाणी कांदा पिकाचा लिलाव देखील सुरू केला असून त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.