Categories: पुणे

हॉटेल ‘गारवा’ चे मालक ‘रामदास आखाडे’ खून प्रकरणातील आरोपीचा जेलमध्ये ‘मृत्यू’

पुणे : संपूर्ण पुणे जिल्ह्यात गाजलेल्या उरुळी कांचन येथील हॉटेल गारवा चे मालक रामदास आखाडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी बाळासाहेब खेडेकर यांचा येरवडा येथील जेलमध्ये मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याची माहिती मिळत आहे. बाळासाहेब खेडेकर हे गारवा हॉटेल च्या बाजूला असणाऱ्या हॉटेल अशोका (उरुळी कांचन) चे मालक होते.

उरुळी कांचन येथील हॉटेल गारवा चे मालक रामदास आखाडे यांच्यावर 18 जुलै 2021 रोजी त्यांच्याच हॉटेल च्या परिसरामध्ये कोयता आणि धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला होता ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर रामदास आखाडे यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. खुनी हल्ल्यानंतर बाळासो खेडेकर आणि त्यांच्या मुलासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये या सर्वांना मोक्का लावण्यात आला होता.

येरवडा येथे मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या बाळासो खेडेकर यांचा पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याची माहिती मिळत आहे. कोणताही वाद नसताना केवळ व्यवसायाच्या वृद्धीतून रामदास आखाडे यांचा खून करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ माजली होती. अनेकांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

14 मि. ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago