लसीकरणामध्ये सलमान खानला घेण्यावरून राम कदमांनी उठवला सवाल, नेटकऱ्यांनी राम कदमांना ट्रोल करत करून दिली ‛ती’ ‛आठवण’

मुंबई : कोरोनाने महा भयंकर रूप धारण केल्यानंतर त्यावर लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने जानेवारी 2021 पासून संपूर्ण देशात लसीकरण सुरू करण्यात आले. राज्यामध्ये लसीकरण सुरू असले तरी काही ठिकाणी लसीकरणाचा वेग कमी असल्याने आता सुपरस्टार सलमान खान याला या लसीकरणात सहभागी करून लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
मात्र राज्य सरकारच्या या धोरणावर भाजप आमदार राम कदम यांनी सवाल उपस्थित केला असून सलमान खानला या मोहिमेमध्ये समाविष्ट करण्याबाबत आम्हाला काही वाटत नाही, परंतु त्याला समाविष्ट करून विशिष्ट धर्मावरून तुष्टीकरण करायचे आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत त्यांचा व्हिडीओ माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर मात्र नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. राम कदम यांना नेटकऱ्यांनी धारेवर धरताना सलमान खान हा एक अभिनेता आहे. तो तुम्हाला गुजरातच्या रॅलीत चालतो. अनेक मुस्लिम अभिनेते तुमच्या दहीहंडी फेस्टिव्हलमध्ये येतात त्यावेळी त्यांची जात, धर्म दिसत नाही, मात्र आत्ताच सलमान खानचा जात, धर्म तुम्हाला कसा दिसतो असा संतप्त सवाल अनेक नेटकऱ्यांनी कदम यांना करत, आता तरी शांत बसा आणि लोकांना त्यांचे काम करू द्या. प्रत्येकवेळी जात,धर्म पाहून लोकांमध्ये वाद निर्माण करू नका असे खडेबोल नेटकऱ्यांनी त्यांना सुनावले आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

22 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago