आईचा बदला घ्यायला गेला अण बापाचा निर्दयीपणे ‘खून’ केला! झोपेत असलेल्या ‘राजेंद्र म्हस्के’ला मित्राच्या सहाय्याने मुलाने ‘असे’ मारले

अब्बास शेख

दौंड

चौफुला येथे वाहन खरेदी विक्री करणारा वाहन डीलर राजेंद्र दत्तात्रय म्हस्के (वय ४२ वर्षे व्यवसाय नियती मोटर्स खरेदी विक्री रा. वरंवड पाटील मळा ता. दौड जि. पुणे) हा अचानक गायब झाल्याची बातमी सर्वत्र पसरली अण त्याचे अपहरण झाले असावे का, की खून झाला असावा की आणखी काय याबाबत केडगाव, चौफुला,वरवंड पंचक्रोशीत चर्चाना उधाण आले होते. आता या सर्व बाबीवरून यवत पोलिसांनी पडदा उठवला असून राजेंद्र म्हस्के याचा खून झाला असून तो खून त्याच्या मुलानेच आपल्या मित्राच्या मदतीने केला असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

आता हा खून नेमका कसा आणि कधी झाला याबाबतही अनेकजण संभ्रमात होते. त्यामुळे आरोपिंनी स्वतः हा गुन्हा कबूल करत तो कसा व का केला याची विस्तृत माहिती पुढील प्रमाणे आहे…

राजेंद्र म्हस्के हा त्याचा अल्पवईन मुलगा व स्वतःच्या पत्नीला दररोज दारू पिवुन शिवीगाळ, मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळुन मयताच्या मुलाने त्याचा मित्र स्वस्तीक संजय खडके याच्या मदतीने राजेंद्र म्हस्के याला जीवे ठार मारण्याचा प्लॅन आखला.दि.26 मे रोजी रात्री राजेंद्र म्हस्के याने आपली पत्नी गौरी हिला दारूच्या नशेत मारहाण केली व दारूची बाटली तिच्या डोक्यात मारली यामुळे तिची दातखिळ बसली. त्यानंतर ती टेरेसवर गेली आणि दरवाजाची कडी लावून घेतली. हा सर्व प्रकारम्हस्के यांच्या मुलाला दररोजचा असल्याने आणि त्यालाही पुन्हा मारहाण झाल्याने तो चिडला होता. राजेंद्र म्हस्के हा झोपायला बेडरूममध्ये गेल्यानंतर त्याच्या मुलाने त्याचा मित्र स्वस्तिक खडके याला सर्व हकीकत सांगत मी उसने दिलेले 50 हजार मला देऊ नको मात्र माझ्या बापाचा बंदोबस्त कर असे त्यास सांगितले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक २७/०५/२०२२ रोजी सकाळी ०६:०० वा चे सुमारास राजेंद्र म्हस्के हा बेडरूममध्ये झोपलेला असतानाच स्वस्तिक खडके याने लोखंडी हातोडीने त्याच्या डोक्यात सलग तीन वेळेस घाव घातले त्यावेळी असह्य वेदनेने तो ओरडू लागल्याने त्याच्या मुलाने उशीने त्याचे तोंड दाबून ठेवले या सर्व प्रकारात तो ठार झाल्यानंतर
त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उददेशने स्वास्तीक संजय खडके याने त्याच्या सेलीरीओ कार गाडी नं.. एम. एच. ४२. ए. एक्स. ३९८७ मधील डिकीत राजेंद्र म्हस्के याची बॉडी टाकून तो ती गाडी घेऊन निघून गेला आणि ती बॉडी त्याने उस्मानाबाद जिल्हयातील येडशीच्या जंगलात टाकुन पुन्हा माघारी आला.
हा सर्व प्रकार पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि केशव वाबळे यांनी तपास करत उघडकीस आणला.
याबाबत राजेंद्र म्हस्के यांचा मुलगा (वय – १७ वर्षे ४ महिने रा. वरंवड पाटील मळा ता. दौड जि. पुणे) व २) स्वस्तीक संजय खडके (वय–२१ वर्षे रा. वरंवड जानाई मळा ता. दौड जि. पुणे) यांचे विरूध्द भादविक ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याबाबतची सरकारतर्फे फिर्याद सहा. पो. निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली आहे.

सदरची कामगीरी ही मा.पोलीस अधिक्षक सो, श्री.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग बारामती श्री मिलींद मोहिते सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस सो यांच्या मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री नारायण पवार, सहा.
पोलीस निरीक्षक श्री केशव वाबळे, घनश्याम चव्हाण, पोलीस नाईक बनं १३३५, सोमनाथ
सुपेकर, पो.कॉ बनं २७४५, समिर भालेराव, पो.कॉ बनं २९३७ पोलीस मित्र आप्पा भंडलकर यांनी केली आहे.