सहकारनामा
दौंड : दौंड तालुक्याला हादरावणारी घटना म्हणजे वाहन खरेदी विक्री करणाऱ्या राजेंद्र म्हस्के याचा त्याच्याच परिवाराने केलेला निर्दयी खून. या खूणामुळे तालुका हादरण्याचे कारण म्हणजे हा खून त्याच्या मुलाने सहकाऱ्यांच्या मदतीने केला होता. ज्यावेळी राजेंद्र म्हस्के हा स्वतःच्या घरात गाढ झोपेत होता त्यावेळी त्याच्या डोक्यात हातोडीचे घाव घालून आणि उशिने तोंड दाबून त्याचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते त्यात दोघांना अटक झाली हाती. मात्र आता या खूनात आणखी एक ट्वीस्ट आले असून राजेंद्र म्हस्के याच्या खूनात त्याची पत्नी आणि आणखी एका 20 वर्षीय मुलाचा हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या कारणामुळे झाला ‘राजेंद्र म्हस्के’ याचा ‘खून’
https://sahkarnama.in/rajendra-mhaske-murder-case/
सर्वांशी हसून खेळून राहणारा, कायम दुसऱ्यांची इज्जत करणारा आणि आपल्या परिवाराला पोसण्यासाठी चाणाक्ष बुद्धीने व्यवसाय करणाऱ्या राजेंद्र म्हस्के याने असे काय केले की त्याचा इतका निर्दयीपने खून करण्यात येऊन त्याला येडशी येथील जंगलात फेकून देण्यात आले, तो गँगस्टर होता की माफिया जो त्यावर इतका मोठा सूड उगविण्यात आला असा संतप्त सवाल आता त्याच्या व्यवसायामुळे त्याच्या कायम संपर्कात असणाऱ्या त्याच्या मित्रमंडळींना पडला आहे.
यवत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र म्हस्के याच्या खुनामध्ये त्याचा अल्पवईन मुलगा आणि स्वस्तिक संजय खडके यांचा हात असल्याचे प्रथम समोर आले होते. नंतर पोलिसांनी त्यांना अटक करून खाकीची पॉवर दाखवील्यावर यात राजेंद्र म्हस्के यांची पत्नी गौरी राजेंद्र म्हस्के (वय 40) आणि प्रथमेश पंडित (वय 20) यांचाही सहभाग असल्याचे आता समोर आले आहे.
या खूनाचा तपास यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक केशव वाबळे व त्यांच्या टिमने उत्कृष्ठ पणे करून तपास करून यातील अन्य मारेकऱ्यांनाही शोधून काढले आहे हे विशेष.