Categories: Previos News

दौंड रेल्वे हद्दीतील घरे पाडायला निघालात पण त्यांच्या पुनर्वसनाचे काय! रेल्वे झोपडपट्टी अस्तित्वासाठी संघर्ष करु : ऑल इंडिया पॅंथर सेनेचा इशारा

अख्तर काझी

दौंड : मागील साठ वर्षापासून दौंड मधील रेल्वे हद्दीत झोपडपट्टी आहे. आज पर्यंत 30 ते 35 वेळा रेल्वे प्रशासनाकडून या झोपडपट्टीतील घरे पाडण्या संदर्भात त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. कधीही त्यांच्या झोपडीवर बुलडोझर घातले जाईल आणि त्यांची राहती घरे, संसार उध्वस्त होईल या भीतीमध्ये सध्या येथील लोक जगत आहेत.

भारतीय स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर सुद्धा आम्ही घराला घर देऊ शकत नाही अशी गंभीर परिस्थिती आहे. तुम्ही त्यांची घरे पाडायला निघालात त्यांच्या पुनर्वसनाचे काय यावर कोणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे पुनर्वसन न करता झोपडपट्टी उध्वस्त करण्याची कारवाई ऑल इंडिया पंथर सेना खपवुन घेणार नाही, या रेल्वे झोपडपट्टी अस्तित्वासाठी संघर्ष केल्याशिवाय पॅंथर सेना शांत बसणार नाही, रस्त्यावरचा संघर्ष केला जाईल असा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला.

दौंड रेल्वे हद्दीमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना येथील रेल्वे प्रशासनाकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर दौंड शहर व तालुका पॅंथर सेनेच्या वतीने दौंड मध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली यावेळी केदार बोलत होते. पक्षाचे पदाधिकारी योगेश थोरात, अमर घोडके, सागर उबाळे आदी उपस्थित होते.
दीपक केदार म्हणाले की, दौंडचा हा ज्वलंत प्रश्न आहे त्यासाठी रस्त्यावर उतरून आम्ही संघर्ष करणार आहे, राज्यव्यापी विषय उभा करणार. केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करणार आहे की, एक तर या झोपडपट्ट्या कायम करा किंवा यांचे चांगल्या जागेवर पुनर्वसन करा. हे जर झाले नाही व झोपडपट्टी उध्वस्त करण्याचे षड्यंत्र केले तर ते कदापि खपवून घेतले जाणार नाही, अशी पॅंथर सेनेची भूमिका आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अमेरिकेसारखे रस्ते करण्यासाठी खूप मोठा पैसा आहे या गडकरींनी सदरच्या झोपडपट्टीतील लोकांच्या घरांसाठी प्रयत्न करावेत असेही केदार म्हणाले.

राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले की, भोंगा प्रकरण राज्यात टिकले नाही आणि टिकणार ही नाही. ज्यांनी भोंगा काढण्याचे वक्तव्य केले आहे त्यांनी पुन्हा पुन्हा प्रबोधनकार ठाकरे वाचण्याची गरज आहे असे आवाहन आम्ही त्यांना करणार आहोत. महाराष्ट्रात मुस्लिमांच्या केसालाही धक्का पॅंथर सेना लागू देणार नाही जर त्यांना टारगेट करण्याचे काम कोणी करत असेल तर जय भीम म्हणत त्यांना वाचविण्याचे काम आम्ही करू असा इशारा दीपक केदार यांनी दिला.
अनुसूचित जातीतील लोकांचे हत्याकांड आणि त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे मात्र तरीही विधानसभेमध्ये या विषयावर चर्चा होत नाही. त्यामुळे हे सरकार अनुसूचित जातीतील लोकांना माणूस म्हणून मोजत आहे का याबाबत शंका येते असे म्हणत या वाढत्या घटनांवर मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेण्याची मागणी केदार यांनी यावेळी केली.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

6 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

8 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago