नवी दिल्ली : राहुल गांधी कोठून उभे राहणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते मात्र आता राहुल गांधी हे रायबरेलीतून उभे राहणार तर अमेठीमधून के एल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
याबाबत एएनआय ने दिलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि अचानक राहुल गांधी यांना रायबरेलीतून तर के एल शर्मा यांना अमेठीमधून ऐनवेळी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आज वरील उमेदवार आपला उमेदवारी दाखल करतील असे सांगितले जात असून ही काँग्रेसने ऐनवेळी केलेली खेळी असल्याचे बोलले जात असून विरोधकांना ऐनवेळी दिलेला झटका मानला जात आहे.
रायबरेली आणि अमेठी हे काँग्रेसचे पारंपारिक गड मानले जात होते मात्र 2019 साली अमेठी येथून राहुल गांधी यांचा स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. हा काँग्रेससाठी मोठा धक्का होता. यावेळी स्मृती इराणी या अमेठी मधूनच निवडणूक लढवत असून त्यांच्याविरोधात काँग्रेसने के एल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. रायबरेली येथून सोनिया गांधी ह्या निवडणूक लढवायच्या मात्र प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.






