पद्मभूषण, उद्योगपती ‛राहुल बजाज’ यांचे निधन, जाणून घ्या त्यांचा संपूर्ण ‛जीवन परिचय’

पुणे : पद्मभूषण, प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे आज शनिवारी निधन झाले आहे ते ८३ वर्षांचे होते. राहुल बजाज हे बजाज समूहाचे अध्यक्ष होते. 2001 मध्ये भारत सरकारने राहुल बजाज यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केले होते.

2006 ते 2010 पर्यंत राहुल बजाज राज्यसभेचे सदस्यही होते. बजाज समूहाला पाच दशकांहून अधिक काळ यशाच्या शिखरावर नेण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा होता. त्यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कोलकाता येथे झाला होता. त्यांनी 60 च्या दशकात बजाज समूहाचे नेतृत्व स्वीकारले होते आणि 2005 मध्ये त्यांनी अध्यक्षपद सोडत त्यांचा मुलगा राजीव बजाज यांना जबाबदारी दिली होती.

राहुल बजाज यांनी अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेतले होते. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात ऑनर्स पदवी, बॉम्बे विद्यापीठातून कायद्याची पदवी आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले होते. 2008 मध्ये त्यांनी बजाज ऑटोचे तीन युनिट्समध्ये विभाजन करीत यामध्ये बजाज ऑटो, बजाज फायनान्स कंपनी फिनसर्व्ह आणि होल्डिंग कंपनीचा समावेश आहे.

राहुल बजाज हे जमनालाल बजाज यांचे नातू होते जे एक उद्योगपती आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोहनदास करमचंद गांधी यांचे प्रमुख समर्थक होते.