पुरंदर विमानतळ भू-संपादणास विरोध करणाऱ्या 250 महिला आणि पुरुषांवर गुन्हा दाखल

सासवड : एखतपूर पुरंदर विमानतळ परिसरात जमीन मोजणीसाठी आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना अडवणूक करणाऱ्या सुमारे 250 स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांवर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी अजय शहाजी जाधव (भुकर मापक, पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे.

भुकर मापक अजय जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आम्ही मौजे एखतपुर येथील मोजणी ठिकाणी पोहचलो असता सदर ठिकाणी पोलीस अधिकारी व महसुलचे अधिकारी मोजणीकामी उपस्थित असताना तेथे जमलेल्या अंदाजे २०० ते २५० पुरूष व महीला आंदोलनकर्त्यांनी आमच्या गाडीला घेराव घालुन आम्हाला मोजणीसाठी आवश्यक असणारे ड्रोन साहीत्य गाडीतुन खाली घेण्यास व आम्हाला व इतर
मोजणीकामी खाली उतरण्यास अटकाव करून मोजणीकामी ड्रोन उडविण्यास विरोध करू लागले.

त्यावेळी पोलीस अधिकारी व महसुल प्रशासनातील अधिकारी यांनी त्यांना जिल्हाधिकारी पुणे यांचे बंदी आदेश लागु असुन त्याचे पालन करा, बेकायदेशीर जमाव जमवु नका व मोजणीचे शासकीय कामात अडथळा आणु नका असे वारंवार समजावुन सांगीतले असता त्यांनी काहीएक ऐकले नाही व आमचे मोजणीचे ड्रोन उडविण्यास तीव्र विरोध करून शासनाचे प्रस्तावित पुरंदर विमानतळाचे भुसंपादनाचे मोजणीच्या शासकीय कामात अटकाव करून अडथळा निर्माण केला.

त्यामुळे दुपारी ३:०० च्या सुमारास मा. उपविभागीय अधिकारी सो पुरंदर यांनी मोजणीचे काम आज केले जाणार नाही असे सांगीतले. त्यामुळे आम्ही परत ऑफीसला आलो व मौजे एखतपुर व मुंजवडी येथे आज रोजी नियोजीत शासकीय मोजणीचे कामकाज झाले नाही असे फिर्यादित नमूद करण्यात आले असून या सर्व प्रकरणाला २०० ते २५० स्थानिक शेतकरी व नागरिकांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.