पुण्यातील ‘पीएसआय’ ची लोणावळ्यात आत्महत्या

पुणे : लोणावळा येथे पुणे पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे उघडकीस आले आहे. अण्णा गुंजाळ असं आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून याप्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. खडकी पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते.

पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ हे तीन ते चार दिवसांपासून बेपत्ता होते. लोणावळा येथे असणाऱ्या टायगर पॉईंट या ठिकाणी शिवलिंग पॉईंट आहे. याच ठिकाणी गुंजाळ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे अजून समजू शकले नाही.