Categories: Previos News

Pune – फरार माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेची मालमत्ता जप्त होणार!



पुणे : सहकारनामा 

संपूर्ण जिल्ह्यात गाजलेले मालमत्ता, खंडणी प्रकरणाचा मुख्य आरोपी आणि माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बराटे याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केल्यानंतर आता त्याच्या मालमत्तेवर टाच आणण्यात येणार असल्याची माहिती कोथरूड पोलिसांच्या माहितीतून पुढे येत आहे. माहिती अधिकार कार्यकार्ता बराटे याला पकडण्यासाठी पकड वॉरंटही बजावण्यात आले होते तरीही तो अजून मिळून आला नाही.

न्यायालयाच्या आदेशाने दि. 03 ऑक्टोबर रोजी त्याच्या विरुद्ध जाहीरनाम्याचा आदेश जारी केला असून सदर जाहीरनामा पुणे शहर व परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी चिटकविण्यात आला होता. 

मात्र तरीही आरोपी शहर पोलिसांच्या ताब्यात आला नसल्याने आता पोलिसांनी बराटेच्या स्थावर मालवत्तेवर टाच आणण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. आता पुणे शहर पोलिसांना न्यायालयाकडून मालमत्ता जप्तीचे आदेश प्राप्त होताच त्याची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बराटे याच्यावर 9 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात  दीप्ती आहेर, शैलेश जगताप, देवेंद्र जैन, अमोल चव्हाण यांचाही समावेश असून याप्रकरणी सुधीर वसंत कर्नाटकी यांनी फिर्याद दिली होती. 

या गुन्ह्यातील इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली होती मात्र बराटे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरारच आहे. बराटे याने या यापूर्वी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालायपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत  ही जामीन अर्ज केला होता. मात्र सर्व  न्यायालयांत त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

14 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago