Pune – पुण्यातील इमारतींमध्ये बाहेरील व्यक्तींना ‛प्रवेशबंद’



– सहकारनामा

पुणे : 

सध्या राज्यासह पुणे शहर आणि जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक झाला आहे. राज्यात वाढत असलेला कोरोनाबाधितांचा आकडा हि चिंतेची बाब आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर आता विविध उपाय योजले जात आहेत. 

या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रहिवाशांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध लावण्यात आले आहेत. आणि जे लोक नियमितपणे या इमारती, सोसायट्यामध्ये येणाऱ्यांची कोरोना चाचणी गरजेची असल्याचे आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत.

पुण्यात होत असलेली कोरोना बाधित रुगणांची वाढ हि चिंतेचा विषय असून हे रोखण्यासाठी  पुणे महापालिका प्रशासकीय यंत्रणेकडून रहिवासी इमारती आणि सोसायट्यांमध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेशास प्रतिबंध  करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता सर्व गर्दीच्या ठिकणी फिरण्यास प्रतिबंध करण्यात आला असून रहिवासी इमारती आणि सोसायट्यांनी त्यांच्या प्रवेशद्वारावर तसा नियमावलीचा फलक लावण्यात याव्यात अशा  सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत.