जिल्हा परिषद आरक्षण सोडतीमध्ये अनेकांच्या आशेवर पाणी! ‘आत्ता काय करु’ म्हणण्याची दिग्गजांवर पाळी

दौंड : जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत आज जाहीर झाली आणि जुन्या आरक्षण सोडतीवर गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या अनेक दिग्गजांना ‘आत्ता काय करु’ अशी म्हणण्याची पाळी आली आहे. दौंड तालुक्याच्या जिल्हापरिषद आरक्षण सोडतीमध्येही असाच काहीसा प्रकार पहायला मिळाला असून अनेकांचा मोठा हिरमोड झाला आहे.

आज दौंड पंचायत समितीची आरक्षण सोडत दौंड तहसील कार्यालयात झाली तर जिल्हापरिषद आरक्षण सोडत कार्यक्रम जिल्हा परिषदेमध्ये पार पडला. या जिल्हा परिषद आरक्षण सोडतीमध्ये –

यवत बोरिभडक गट – ना.मा.प्र.महिला
वरवंड-बोरिपार्धी गट – सर्वसाधारण,
पारगाव-पिंपळगाव गट – अनुसूचित महिला,
गोपाळवाडी-कानगाव गट – सर्वसाधारण,
खड़की-राजेगाव गट – अनुसूचित महिला,
लिंगाळी-देऊळगाव – सर्वसाधारण,
पाटस-कुरकुंभ गट – सर्वसाधारण, राहू-खामगांव गट – सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहे.

वरील आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक दिग्गजांच्या आशेवर पाणी फिरले असून गेली कित्येक महिने कार्यकर्त्यांवर केलेली ‘विशेष’ मेहनत बेकार गेली असल्याची भावना या गटांमधील इच्छुक खाजगीत बोलून दाखवू लागले आहेत.