पुणे | सहायक पोलीस आयुक्त (ACP) कडून पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या, स्वतःलाही संपवले

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याने आपली पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या करत स्वतःलाही संपवल्याची घटना घडली आहे. इतक्या मोठ्या दर्जाच्या अधिकाऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

अमरावती पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी आपली पत्नी मोनी गायकवाड आणि पुतण्या दीपक गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याची ही दुःखद घटना आहे. ही घटना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती मिळत असून एसीपी गायकवाड यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यामागचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या घटनेचा पुणे पोलिसांनी कसून तपास सुरू केला असून ही हत्या नेमकी कोणत्या करणातून झाली याची माहिती अजून समजू शकलेली नाही. एका सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत स्वत: आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago