कारच्या धडकेत 13 वर्षीय शालेय मुलीचा मृत्यू

भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवण (ता. इंदापूर) येथे महामार्ग ओलांडत शाळेत जात असताना भरधाव कारच्या धडकेत १३ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली.

या अपघातात, अनुष्का अनिल गायकवाड (वय.१३ रा. राजेगांव, ता.दौंड, हल्ली यश हाईट्स भिगवण, ता.इंदापुर) असे अपघातामध्ये मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. अनुष्का ही आदर्श विदयालयामध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. शनिवारी (ता.२०) सकाळी शाळा असल्यामुळे शाळेला निघाली होती. हॉटेल सागर समोर राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना पुणे बाजुकडुन सोलापुर बाजुकडे निघालेल्या भरभाव क्रेटा कारने(क्र.एम एच १४ जे एम ९५०५) तिला जोरदार धडक दिल्याने अनुष्का हि जागीच ठार झाली.

या प्रकरणी वडील अनिल गायकवाड (वय. ४५,रा.राजेगांव, ता.दौंड, हल्ली यश हाईट्स भिगवण, ता.इंदापुर) यांच्या फिर्यादिनुसार कार चालक मंदार गोपाल दामले(वय ४७ रा. निगडी प्राधीकरण पुणे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार श्री.सोननिस करीत आहेत.

आदर्श विद्यालयावर दुहेरी शोककळा
दोन दिवसात दोन विद्यार्थी पुणे-सोलापूर महामार्गावर वेगवेगळ्या अपघातात दोन विद्यार्थ्याना जीव गमवावा लागला आहे. कालच कर्मयोगीचे संचालक विश्वास देवकाते यांचा आदर्श विद्यालयात शिकत असलेला आदित्य देवकातेचा घागरगाव येथे अपघात म्रुत्यु झाला तर आज भिगवण येथील अपघात अनुष्का गायकवाड हिचा मृत्यू झाल्याने शालेय विद्यार्थी पालक गावकरी हळहळ व्यक्त करत आहे.