दौंड : दौंड तालुक्यातील भांडगाव येथे बंगल्यातील कपाटातून अज्ञात चोरट्यांकडून सोने-चांदीच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली असून याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 18 ऑगस्ट रोजी अज्ञात तीन आरोपींनी फिर्यादी उमेश थोरात राहते यांच्या घरामध्ये अनाधीकाराने प्रवेश करून बेडरूमधील लाकडी कपाटातुन सोन्याचे, दागीने सोन्याचे वस्तु, चांदीचे
वस्तु व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला.
चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये
१) १,००,०००/- रुपयांचे सोन्याचा हार दोन तोळे.
२) २५,०००/– रुपयांचे सोन्याचे
कानातले.
३) १५,०००/– रुपयांच्या सोन्याच्या रिंगा, अर्धातोळा तीन ग्राम ४) ५०,०००/–सोन्याचे
५) ५०,०००/मंगळसुत्र १ तोळा १००० ग्राम चांदीच्या वस्तु, १०,०००/- या ऐवजांचा समावेश असून या घरफोडीमध्ये एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
या घटनेचा अधिक तपास यवतचे पोसई नागरगोजे हे करीत आहेत.