भिगवण : भिगवण पोलीसांनी अट्टल दरोडेखोरांचा दरोडयाचा प्रयत्न उधळून लावला असून दरोडेखोरांची ही टोळी जेरबंद, करत टोळीकडुन एक गावठी बनावटीचे पिस्टल व इतर साधने केली जप्त केली आहेत.
दिनांक. २२/११/२०२१ रोजी भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार सहा. पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या माहितीनुसार भिगवण गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सोनाज H.P पेट्रोलपंपावर ४ ते ५ दरोडेखोर हे सशस्त्र दरोडा घालणार असल्याचे समजले होते. या माहितीच्या आधारे पोलीस दिलीप निरीक्षक पवार यांनी लागलीच पोलीस स्टाफ मदतीस घेवुन सदर ठिकाणी सापळा रचत यातील आरोपी १) संदिप आनंद हीरगुडे (वय ३४ वर्षे रा.हारनस, ता.भोर, जि.पुणे) २) अनिकेत विलास सुकाळे, (वय२३ वर्षे, रा.मुळ रा. कांबरे ता.भोर जि.पुणे सध्या रा.मारूती मंदिराजवळ, रायकरमळा, धायरी,पुणे) ३) रामदास उर्फ युवराज ज्ञानोबा शेलार, (वय.३३ वर्षे रा.वाकम्बे ता.भोर, जि. पुणे सध्या रा.मारूती मंदिराजवळ, रायकरमळा, धायरी, पुणे) यांना ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे इतर साथीदार ४) शंभुराज मच्छिंद्र जेधे, (रा.आंबवडे ता. भोर जि.पुणे) ५) पुनित (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) हे सदर पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आले असल्याचे सांगितले.
यावेळी पोलीसांनी आरोपींकडून एक गावठी पिस्टल, पाच जिवंत काडतुस, एक लोखंडी कटावणी, एक चाकु, एक रस्सी, मिरचीची पुड व एक होंडा कंपनीची ड्रिम युगा मोटार सायकल नंबर एम.एच.१२/ के.एक्स.६४१९ असा एकुण १,०५,२००/- रूपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत भिगवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर.२९५/२०२१,भा.द.वि.कलम.३९९,४०२, भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही मा. डॉ.अभिनव देशमुख साो, पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण, मा.मिलींद मोहीते सो, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा. गणेश इंगळे सो, उपविभागीय
पोलीस अधीकारी, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मा दिलीप पवार सो, सहा.पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, रूपेश कदम,
पोलीस अंमलदार इन्कलाब पठाण, समीर करे, आप्पा भंडलकर, रामदास जाधव, सचिन पवार, अंकुश माने, शंकर निंबाळकर, सुभाष गडदे, पोलीस मित्र रवी काळे, विकास गुनवरे, अशोक चोळके यांनी केली आहे.