2 गावठी पिस्तूल आणि 5 जिवंत काडतूसांसह दोघे जेरबंद, Lcb ची धडक कारवाई

खेड शिवापूर : खेड शिवापूर येथून ०२ गावठी पिस्टल व ०४ जिवंत काडतुसे जप्त करून दोघांना जेरबंद करण्याची दमदार कामगिरी पुणे ग्रामीण एलसीबी ने केली आहे.
दिनांक ०८ /१२/२०२१ रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे टिम राजगड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना PC प्राण येवले यांना राजगड पोलीस स्टेशन हद्दीत पुणे ते सतारा रोडवर कोंढणपूर चौकात हायवेच्या ब्रिजखाली उभे असलेल्या दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचालीवरून एक गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे मिळालेल्या बातमीच्या वर्णनावरून इसम १) संतोष अंकुश डिम्बळे (वय २१ रा.दत्तनगर, टेलको कॉलनी, पुणे ता.हवेली जि.पुणे)
२) उमेश दिलीप वाव्हळ (वय २५ वर्ष, रा.बांडेवाडी, खेड शिवापूर ता.हवेली) यांना पोलिसांनी संशय न येता शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले असता विनापरवाना व बेकायदेशीर हेतुने दोघांच्याही कमरेला बाळगलेले प्रत्येकी ०१ गावठी पिस्टल व मॅगझीन मध्ये ०२ जिवंत काडतुस असे एकूण ०२ गावठी पिस्टल व ०४ जिवंत काडतुसे असे एकुण किं.रु.१,००,४००/- (एक लाख चारशे रुपये) चा मुद्देमाल मिळून आला. सदर गावठी पिस्टल कुठून व कोणत्या हेतूने आणले याबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरचे दोन्ही पिस्टल हे प्रवीण मोरे (रा.शिवरे ता.भोर जि पुणे) याने आमच्याकडे ठेवायला दिले होते अशी माहिती दिली आहे.
सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी राजगड पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक श्री डॉ.अभिनव देशमुख सो.,मा.अप्पर पोलीस अधीक्षक बारामती श्री मिलींद मोहिते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस श्री निरीक्षक अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली
पोउपनि रामेश्वर धोंडगे
Asi प्रकाश वाघमारे ,
PN अमोल शेडगे
PC. प्राण येवले
यांचे पथकाने केली आहे.