बनावट वाहन इन्शुरन्सच्या आधारे एजंट आणि मालकांनी केली आर.टी.ओ (RTO) ची 2 लाख 14 हजारांची फसवणूक, पुणे जिल्ह्यातील 11 जणांवर गुन्हा दाखल

अब्बास शेख

पुणे : वाहन एजंट आणि वाहन मालकांनी संगनमत करून बनावट वाहन इन्शुरन्सच्या आधारे सासवड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) पुणे यांची तब्बल 2 लाख 14 हजार 932 रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत आत्तापर्यंत 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची व्याप्ती आणि यातील आरोपी संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत वाहन निरीक्षक रेणुका राधाकिसन राठोड (प्रादेशिक परिवहन कार्यालयातील पुणे) यांनी फिर्याद दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
1) रोहीदास झेंडे (रा.दिवे ता पुरंदर जि
पुणे)
2) उमेश घाणेकर (रा.सर्व्हे नंबर 107 ओम रेसीडन्सी फलॅट नमो नंबर 22 रायकर मळा धायरी)
3) नागनाथ एडके (रा.
कमलदत्त निवास, एन.डी.ए रोड शिवणे, पुणे)
4) मोहन धारवटकर (रा.रांजणे ता.वेल्हा जि.पुणे)
5) बबन बधे (रा.रांजणे ता.वेल्हा जि.पुणे) व इतर 6 आरोपी असे 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहन निरीक्षक राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या दि. 13 ऑगस्ट ते दि. 18 ऑगस्ट दरम्यान वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र तपासणी व नुतनीकरण कार्यालय दिवे ता.पुरंदर जि पुणे येथे वाहनांची योग्यता प्रमाणपत्र तपासणी करत असताना वरील आरोपिंनी संगणमत करून शासकीय नियमानुसार विमा (इन्शुरन्स) रक्कम भरली आहे असे भासवुन प्रत्यक्ष रक्कम 2 लाख 14 हजार 932 एवढी रक्कम कमी भरली व शासनाची फसवणुक केली असल्याचे निदर्शनास आले. म्हणुन वरील आरोपिंनी बनावट वाहन इन्शुरन्सच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याने फिर्यादी यांनी त्यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास सासवड चे पोलीस उपनिरीक्षक झिंजूरके हे करीत आहेत.