साबळेवाडीच्या मा.सरपंचाने कंपनीला लावतो म्हणून भाड्याने घेतलेल्या ‛त्या’ गाड्या विकल्याचे आले समोर, पोलीसांनी आत्तापर्यंत 48 गाड्या केल्या हस्तगत

पुणे : खेड तालुक्यातील साबळेवाडी येथील माजी सरपंचाने कंपनीला गाडया लावतो म्हणून त्या गाड्या साथीदाराच्या मदतीने विकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या सरपंचाने अपहार करुन भोसरी, दौंड, खेड व इतर ठिकाणच्या लोकांची फसवणुक करत शेकडो गाड्या गायब केल्या होत्या त्यापैकी आता पोलिसांनी आरोपींना अटक करून आत्तापर्यंत ४८ गाडया हस्तगत केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेड पोलीस स्टेशन गु.र.नं. ६६०/२०२१ भा.द.वी. कलम ४२०, ४०६ मधील फिर्यादी अमोल मनाजी भागडे (रा.पाडळी, ता.खेड, जि.पुणे) यांनी दि.०३/११ / २०२१ रोजी व गु.र.नं. ६६१/२०२१, भा.द.वी कलम ४२०,४०६ मधील फिर्यादी सुभाष बाळू सांडभोर (रा. थिगळस्थळ, राजगरुनगर ता.खेड, जि.पुणे) यांनी दिनांक ०४/११ / २०२१ रोजी खेड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये त्यांचेकडून गेले एक ते दिड वर्षापासून वेळोवेळी सागर मोहन साबळे, (रा.साबळेवाडी, ता.खेड, जि.पुणे) याने वेगवेगळया कंपनीच्या एकुण ५५ चारचाकी गाडया मासीक भाडेतत्वावर घेवुन महिन्याला ठरावीक रक्कम देतो असे म्हणुन सुरुवातीला काही दिवस ठरल्याप्रमाणे भाडे देऊन फिर्यादींचा विश्वास संपादन केला होता. मात्र नंतर सदर गाडयांचे ठरलेप्रमाणे भाडे देणे बंद करुन सर्व गाडयांचा अपहार करुन फिर्यादी यांची फसवणुक केली असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले होते.
सदर दोन्ही गुन्हे दाखल झालेनंतर गुन्हयाचा तपास चालू असतांना गुन्हयातील अपहार
झालेल्या गाडया आरोपी सागर मोहन साबळे व त्याचे साथीदार यांनी माजलगाव, बीड,
परभणी, पाथरी, हिंगोली, वडवनी या भागातील लोकांना बेकायदेशीरपणे विकले असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर दोन्ही गुन्हयातील अपहार झालेल्या एकुण ५५ गाडयांपैकी काही गाडयांचा जी.पी.एस.
द्वारे शोध घेतला तर काही गाडयांचा गुप्त बातमीदार व आरोपी यांचेमार्फत शोध घेऊन पोलिसांनी आत्तापर्यंत एकुण ४८ गाडया हस्तगत केल्या आहेत. गुन्हयाच्या अनुषंगाने यातील आरोपी सागर साबळे तसेच त्याचा साथीदार अजय लिंबाजी धुमाळ, (रा.गजानन
नगर माजलगाव, ता.माजलगाव, जि.बीड) यांना अटक करण्यात आली असून अटक आरोपींना न्यायालयाने दिनांक ०४/१२/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे. वरील आरोपी विरुद्ध भोसरी, दौंड परीसरात देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी ही मा डॉ. अभिनव देशमुख. पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण, मा.
श्री. मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा.श्री. मदार जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सतिषकुमार गुरुव, वरीष्ठ पोलीस निरीक्षक खेड, पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक श्री.भारत भोसले, पो.हवा. संतोष घोलप, बाळकृष्ण भोईर, पो. ना. शेखर भोईर, सचिन जतकर, संदिप चौधरी, पो.अंमलदार निखील गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे, विशाल कोठावळे, योगेश भंडारे, रमशे करंडे, संजय रेपाळे यांनी तपास करुन आरोपींना जेरबंद केले आहे. दोन्ही
गुन्हयातील अपहार झालेल्या एकुण ५५ गाडयापैकी आत्तापर्यंत एकुण ४८ गाडया हस्तगत केल्या असून पुढील गुन्हयाचा तपास खेड पोलीस स्टेशन हे करीत आहेत.