क्राईम

8 वीत शिकणाऱ्या ‛त्या’ अल्पवयीन कबड्डीपटू मुलीच्या खून प्रकरणी चार आरोपींना अटक

पुणे :
8 वीत इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या कबड्डीपटू मुलीच्या खून प्रकरणी पुणे पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
यात मुलीचा खून करणाऱ्या ऋषिकेश भागवत या मुख्य आरोपीला पहाटेच पोलिसांनी अटक केली.
काल पुण्याच्या बिबवेवाडी भागामध्ये कबड्डी खेळत असणाऱ्या अल्पवयीन कबड्डीपटू मुलीचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या या खूनामुळे पुणे शहरात एकच खळबळ माजली होती. पालक वर्ग आणि राजकीय वर्तुळातून याबाबत अनेक प्रतिक्रिया उमटत होत्या त्यामुळे आरोपींना त्वरित अटक करण्याचे मोठे आव्हान पुणे शहर पोलिसांसमोर होते.
मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश भागवत हा आरोपी खून करून घटनास्थळाशेजारीच असणाऱ्या झुडपात रात्रभर लपून बसला होता. याची खबर पोलिसांना शोधमोहीम राबवताना लागली आणि पोलिसांनी ऋषिकेश भागवत या आरोपीला बुधवारी पहाटे अटक केली.
यातील आरोपी ऋषिकेश भागवत हा खून झालेल्या त्या मुलीचा नातेवाईक असल्याची माहिती समोर येत असून त्याने एकतर्फी प्रेमाच्या हव्यासातून हे कृत्य केले असल्याचे उघड झाले आहे. या खुन्याला मदत करणाऱ्या त्याच्या अन्य साथीदारांनाही अटक करण्यात आली असून या नारधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

13 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago