Categories: पुणे

पुणे-मुंबई एक्सप्रेसवर 6 वाहनांचा विचित्र अपघात, 3 जण ठार, अनेकजण जखमी

पुणे : पुणे-मुबई एक्सप्रेसवर 6 वाहनांचा विचित्र अपघात झाला असून या अपघातामध्ये 3 जण ठार झाले आहेत तर अनेकजण जखमी झाले आहेत.
दि.18 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच च्या दरम्यान खोपोली जवळ असणाऱ्या बोर घाटात हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत असून अगोदर दोन वाहनांची धडक होऊन नंतर विचित्र पद्धतीने अन्य वाहने धडकी असल्याचे समोर येत आहे.
पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या लेनवर कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो आणि पुढे चाललेला टेम्पो यामध्ये प्रथम हा अपघात घडला त्यानंतर पाठीमागून येणारी जवळपास 6 वाहने हि एकमेकांवर आदळली. यात दोन टेम्पो, खाजगी बस, ट्रेलर आणि दोन कारचा समावेश आहे. हा अपघात इतका भयानक होता की यात 3 जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. अपघातात कोणती गाडी कोणत्या गाडीला धडकली हेच काहीकाळ समजून येत नव्हते. रस्त्यावर सर्वत्र गाड्या विखुरल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

14 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago