पुणे : वडगांव मावळ येथून ०२ गावठी पिस्टल व ०४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही दमदार कामगिरी पुणे ग्रामीण एलसीबीच्या पथकाने केली आहे.
आज दिनांक २१ /०१/२०२२ रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची टिम वडगांव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना PC प्राण येवले यांना वडगांव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत जुना पुणे ते मुंबई हायवे रोडवर वडगांव-तळेगाव चौकात हायवेच्या बाजूला उभे असलेल्या दोन व्यक्तींबाबत माहिती मिळाली होती. यावेळी त्या दोघांच्या संशयास्पद हालचाली वरून पोलीसांनी १) अनिल राघू शिंदे (वय ३३ रा पवनानगर, ता. मावळ जि.पुणे, हल्ली पौड ता.मुळशी, जि पुणे) व २) धर्मेश रवींद्रकुमार जयस्वाल (वय २३ वर्ष, रा.काळा तलाव,भिकाजी भैय्या चाळ, कल्याण पश्चिम जि ठाणे) यांना सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडून विनापरवाना व बेकायदेशीर हेतुने दोघांच्याही कमरेला बाळगलेले प्रत्येकी ०१ गावठी पिस्टल व मॅगझीन मध्ये ०२ जिवंत काडतुस असे एकूण ०२ गावठी पिस्टल व ०४ जिवंत काडतुसे असे एकुण किं.रु.१,००,४००/- (एक लाख चारशे रुपये) चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी क्रमांक 1 हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वीचे 02 गुन्हे दाखल आहेत..
सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी वडगांव मावळ पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक श्री डॉ.अभिनव देशमुख सो.,मा.अप्पर पोलीस अधीक्षक पुणे श्री मितेश घट्टे सो.,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि रामेश्वर धोंडगे, Asi प्रकाश वाघमारे , PN अमोल शेडगे, PN बाळासाहेब खडके, PC प्राण येवले, PC मंगेश भगत, Wpc पूनम गुंड, Wpc सुजाता कदम यांचे पथकाने केली आहे.