Categories: Previos News

Pune Daund Railway : आवश्यक सेवांसाठी दैनंदिन प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दौंड – पुणे अनारक्षित शटल रेल्वे सेवा सुरु



दौंड : सहकारनामा

कोरोनामुळे गेले १० महिने दौंड- पुणे लोहमार्गावर अनारक्षित पॅसेंजर / शटल रेल्वे सेवा बंद असल्याने अत्यावश्यक सेवा तसेच आवश्यक सेवांसाठी कार्यरत असलेल्या दौंड – पुणे दैनंदिन रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठे हाल सहन करावे लागत होते. 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनलॉक पिरियडमध्ये टप्प्याटप्प्याने रेल्वे सेवा सुरु होऊनही फक्त आरक्षित प्रवाशांनाच रेल्वे प्रवासाची परवानगी दिली गेली होती. त्यामुळे अनारक्षित असणाऱ्या अत्यावश्यक सेवा, शासकीय, निमशासकीय सेवा तसेच आवश्यक सेवांसाठी दौंड – पुणे असे डेली रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी दौंड पुणे शटल सुरू करण्याची मागणी होत होती.

या मागणीला आज २६ जानेवारी पासून यश आले असून आजपासून दौंड – पुणे अनारक्षित शटल रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. 

दौंड- पुणे लोहमार्गावर अनारक्षित पॅसेंजर /शटल रेल्वे सुरु करण्यसाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांनीही पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेकवेळा पाठपुरावा केला होता तसेच दौंड -पुणे प्रवासी संघ व इतर सर्वपक्षीय संघटनांनीही प्रयत्न केले होते. या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांना अखेर यश आले असून आजपासून दौंड – पुणे अनारक्षित शटल रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे.

या शटलमध्ये पहिल्या टप्यात फक्त अत्यावश्यक सेवा, शासकीय, निमशासकीय सेवा तसेच आवश्यक सेवांसाठी दौंड – पुणे हा दैनंदिन रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साक्षांकित करून QR कोड दिला जाणार असून त्याआधारे रेल्वे द्वारे अनारक्षित तिकीट किंवा मासिक पास वितरित केला जाणार आहे.

सर्व प्रवाश्यांना शटल उपलब्ध होण्याबाबत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी बोलताना लवकरच आपण सर्व प्रवाशांसाठी दौंड – पुणे अनारक्षित शटल रेल्वे सेवा उपलब्ध व्हावी यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

9 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

1 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 दिवस ago