Categories: क्राईम

पुणे-सासवड रोडवर अवैध गुटखा पकडला! गुन्हे शाखा युनिट 6 कडून 2 आरोपी जेरबंद, ‛12 लाखांचा’ मुद्देमाल जप्त

लोणीकाळभोर : लोणी काळभोर हद्दीमधून सासवडमार्गे पुण्याचे दिशेने मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या एका महिंद्रा बोलेरो पिकअपला शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने अडवून लाखो रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला आहे.

गुन्हे शाखा, युनिट ६, पुणे शहर पोलीस पथकाने सापळा रचून वडकी गावचे हद्दीत सकाळ प्रेस समोर,पुणे सासवड रोड येथे महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एमएच-१२/एनएक्स/५७१८ ही ताब्यात घेत त्याचा पिकअप चालक शाहरुख इस्लाम शेख (वय २३ वर्षे, रा. घोरपडे वस्ती, अंबिका माता मंदिराजवळ,लोणी स्टेशन,लोणी काळभोर,ता.हवेली,जि.पुणे) व गुटख्याचा माल खरेदी करणारा इसम सुरेश मिलापचंद ओसवाल (वय-४४ वर्षे,रा.महात्मा फुलेनगर,माळी मळा,राजेंद्र पेट्रोल पंपाचे समोर, लोणीकाळभोर,ता.हवेली,जि.पुणे) यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडील ७,४३,६००/- रुपये किंमतीचा ४३५ किलो विमल गुटखा व
वाहतूकीकरिता वापरलेला ४,५०,०००/- रु किंमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण ११,९३,६००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

हा माल बाजारा मध्ये दुप्पट किंमतीने विकला जात असल्याचे निदर्शसनास आले
असून बाजारभावाने जप्त गुटखा मालाची किंमत लाखोंमध्ये जात आहे. पिकअप चालक शाहरुख इस्लाम शेख व गुटख्याचा माल खरेदी करणारा इसम सुरेश मिलापचंद
ओसवाल यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्र.२०२२ भादवि कलम १८८,२७२,२७३,३४, व
अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम ३०(२)(अ),२६(२)(I),२६(२)(IV),अन्न सुरक्षा मानके कायदा प्रोव्हिबिशन अॅण्ड
रिस्ट्रीक्शन ऑन सेल नियमन २०११ चे नियमन २.३.४ तसेच सहवाचन ३(1)ZZ चे उल्लंघन केल्याने नियम ५९ अन्वये
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह-आयुक्त, डॉ.रविंद्र शिसवे, मा.अपर पोलीस आयुक्त,श्री.रामनाथ पोकळे ,गुन्हे शाखा,पुणे, मा.पोलीस उप-आयुक्त,श्री.श्रीनिवास घाडगे,
गुन्हे शाखा पुणे शहर, मा.सहा.पोलीस आयुक्त,गुन्हे-१,पुणे शहर,श्री.गजानन टोम्पे, मा.सहा.पोलीस आयुक्त,गुन्हे-२,श्री.
नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा,युनिट-६ चे पोलीस निरीक्षक,श्री.गणेश माने, सहा.पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पो.उप.नि.सुधीर टेंगले, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन
शिंदे, नितीन मुंढे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर व ज्योती काळे यांनी केली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

11 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

13 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

15 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago