पुणे : पुणे शहरातील भवानी पेठमध्ये असणाऱ्या विशाल सोसायटीत एक हल्कासा स्फोट झाला असून या स्फ़ोटाबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. स्फोट झाल्यानंतर स्थानिकांनी याची माहिती त्वरित पोलिसांना दिल्यानंतर पुणे शहर पोलिसांनी ज्या फ्लॅटमध्ये स्फोट घडला त्यात राहणाऱ्या एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार भवानी पेठेत असणाऱ्या विशाल सोसायटी मधील तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या एका फ्लॅटमध्ये हा संशयित स्फोट झाला असून या स्फोटामुळे त्या फ्लॅटच्या खिडक्या फुटल्या आहेत.
या फ्लॅटमध्ये इलेक्ट्रिशियन चे काम करणारी एक व्यक्ती राहत असल्याचे समोर येत असून त्यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचीच चर्चा सध्या या परीसरात सुरु असून पोलीस करत असलेल्या चौकशीअंती यातील खरी बाब समोर येणार आहे.