Categories: Previos News

Pune : ‛कंगना’ला राणी लक्ष्मी बाईंचा अवतार म्हणणाऱ्या राम कदमांविरोधात ‛पुण्यात’ काँग्रेसचे आंदोलन



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

अभिनेत्री कंगना राणावत हि राणी लक्ष्मीबाई यांचा अवतार असल्याचे भाजप आमदार राम कदम यांनी विधान केल्याने त्यांचा आज पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे  बालगंधर्व चौक राणी लक्ष्मीबाई स्मारक येथे निषेध करून आंदोलन करण्यात आले.

कंगना राणावत ह्या राणी लक्ष्मीबाई यांच्या अवतार असल्याचे वादग्रस्त विधान भाजप आमदार राम कदम यांनी काल केले होते. त्यांच्या या विधाना विरोधात आक्रमक होऊन पुणे शहर युवक कॉंग्रेस तर्फे राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारकला पुष्पहार घालून राम कदम व भाजप नेत्यांचा निषेध करण्यात आला.

भाजप आमदार राम कदम यांनी वादग्रस्त विधान करून थोर क्रांतिकारी राणी लक्ष्मीबाई यांचा अपमान केल्याचे युवक काँग्रेसचे म्हणणे असून या विधानाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने आज आंदोलन करून राम कदम यांन यांनी जर या विधानावर माफी मागितली नाही तर युवक काँग्रेस त्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही.” असा इशारा दिला.

भाजप नेत्यांनी ज्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते राणी लक्ष्मीबाई पर्यंत महापुरुषांना बदनाम करण्याचे सत्र चालवले आहे त्यांच्या विरोधात युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस आता अजून आक्रमक होत राहील, कारण यामुळे येणाऱ्या पिढी मध्ये महापुरुष बद्दल संभ्रम निर्माण होत आहे जे आम्ही कदापि होऊ देणार नाही ” असे यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

या आंदोलनावेळी पुणे शहर उपाध्यक्ष सौरभ अमराळे, संकेत गलांडे, पुणे शहर सरचिटणीस विवीयन केदारी, पुणे शहर सरचिटणीस कुणाल काळे, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अभिजीत रोकडे, आसिफ खान व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

19 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago