Pune : पुण्यात पुन्हा रानगवा अवतरला, नागरिकांची धावपळ



पुणे : सहकारनामा ऑनलाइन

मागील काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील कोथरुड परिसरामध्ये रानगवा आल्याने मोठी हुल्लडबाजी झाली होती. या धामधुमीत बिचाऱ्या रानगव्याला प्राणास मुकावे लागले असल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा रानगवा दिसल्याने एकच खळबळ माजली आहे. 

हा गवा मुंबई -बँगलोर महामार्गालगत बावधन जवळ दिसला आहे. या बाबतची माहिती वन विभाग आणि पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहचले आहेत.

आलेला रानगवा हा सध्यातरी शहरापासून लांब असून महामार्गाच्या जवळ असणाऱ्या एका जंगलात तो आढळून आला आहे.

हा गवा आज सकाळी नागरिकांना दिसल्यानंतर याची माहिती त्यांनी संबंधित खात्यांना दिली आहे. नागरिकांना माहिती मिळाल्यानंतर वन विभाग व पोलीस या ठिकाणी पोहचले आहेत. 

नागरिकांनी घाबरून न जाता हुल्लडबाजी करू नये असे आवाहन नागरिकांना केले जात आहे.

वनातून आलेला हा रानगवा पुन्हा आपल्या निवासस्थानी जाण्यासाठी वन विभागाचे विचारविनिमय सुरू असून सध्यातरी हा प्राणी कोणताही उपद्रव न करता एका ठिकाणी शांतपणे उभा असल्याची माहिती मिळत आहे