Proud : जीव धोक्यात घालून महावितरण कर्मचाऱ्यांकडून उत्तम सेवा देण्यावर भर



देऊळगावराजे : सहकारनामा ऑनलाईन

देऊळगाव राजे ( ता.दौंड ) येथे  महावितरणचे ११के व्ही सबस्टेशनआहे. या ठिकाणाहून देऊळगाव ,वडगाव, पेडगाव, हिंगणी, शिरापुर या गावांना वीज पुरवठा केला जातो. ल या वर्षी कधी नव्हे इतका जून, जुलै महिन्यात भरपूर पाऊस झाला. पाऊस सुरू असतानाही कर्मचारी पावसामध्ये अहोरात्र काम करुन ग्राहकांना तत्पर सेवा  देत आहेत त्यामुळे या भागातील ग्रामस्थ समाधानी आहेत.

चालु वर्षी पर्जन्यमान अधिक असुन या भागात वादळी वाऱ्या सह  पाऊस होत आहे. त्यामुळे विद्युत खांब पडणे ,तारा तुटणे ,ट्रान्सफार्मच्या लिंक जाणे ईत्यादी घोटाळे खूप होत आहे. मात्र असे असुनही या भागात रात्री अपरात्री येऊन विद्युत कर्मचारी सेवा देत आहेत.

या भागातील लाईटच्या संदर्भात ग्रामस्थांना माहिती मिळावी यासाठी विद्युत कर्मचाऱ्यांनी  सोशल मिडियाचा वापर करुन एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे. यामध्ये प्रत्येक गावातील ठराविक वीज ग्राहक व्यक्तींंना जोडले आहे.

कुठल्या गावात  लाईट कधी येईल किंवा काही घोटाळा आहे याचे मेसेज ग्रुपवर अधिकारी टाकतात त्यामुळे एखाद्या गावात पावसामुळे विद्युत खांब किंवा तार तुटलेली असेल तर लगेच समजते त्यामुळे पुढील अनर्थही टळतो आणी लाईट संदर्भात माहितीही मिळते त्यामुळे परिसरात या ग्रुप बाबत समाधान व्यक्त होत आहे. या कामी सहाय्यक अभियंता अमित धोत्रे आणि त्यांची सर्व टीम अहोरात्र झटत आहे.