सुधीर गोखले
सांगली : जैन समाजाचे आचार्य नंदी महाराज यांच्या हत्येप्रकरणी सांगली जिह्यातील मिरज’मध्ये जैन बांधवांकडून मूक निषेध मोर्चा काढून या हत्येचा निषेध करण्यात आला. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यामधील हिरेकुडी प्रांतामध्ये जैन आश्रमातील आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराज यांची नुकतीच निर्घृण हत्या करण्यात आली होती.
मिरजेतील जैन बांधवानी या संशयित हल्लेखोरावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी मिरजेतील प्रमुख मार्गावरून मूक रॅली द्वारे आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच यावेळी कारवाई च्या आशयाचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले.
जैन समाज बांधवानी शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर येथून मूक रॅली ची सुरवात केली हातात विविध निषेधाचे फलक घेऊन हि रॅली सराफ कट्टा मार्गे महाराणा प्रताप चौक पासून किल्ला भागातील प्रांत कार्यालयाजवळ विसर्जित झाली यावेळी निषेधाचे निवेदन देऊन आचार्य नंदी महाराज श्रद्धांजली वाहण्यात आली.
निवेदनातील आशय असा, संपूर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या जैन समाजातील आचार्यांची अशा प्रकारे हत्या होत असेल तर आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो तसेच या हत्येमागील प्रवृत्तीस कठोर शासन झाले पाहिजे. या हत्येचा तीव्र निषेध.
या मूक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर श्रावक श्राविका सहभागी झाल्या होत्या या रॅली मध्ये शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरासह आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर मुनी सुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरातील श्रावक श्राविकांनी आपल्या हातात विविध निषध फलक घेतले होते.