महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीच्या वतीने ‘या’ मागणीसाठी निषेध मोर्चा

अख्तर काझी

दौंड : महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांमधील हजारो जागा रिक्त ठेवून कंत्राटी कामगार नेमून काम करण्याच्या धोरणास व महाराष्ट्रातील वीज उद्योगाच्या प्रस्तावित खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी म.रा.वी. कर्मचारी -अधिकारी- अभियंता संघर्ष समितीच्या वतीने दौंड मध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघर्ष समितीच्या वतीने दौंड तहसील कार्यालयाला निषेधाचे निवेदन देण्यात आले.

केंद्र शासनाचा सुधारित कायदा येण्यापूर्वी राज्यात कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करणे, महापारेषण मध्ये खासगी भांडवलदारांना खुले करणे, महावितरणच्या भांडुप परिमंडळातील कार्यक्षेत्रात खासगी इलेक्ट्रिक कंपनीने वीज वितरणासाठी मागितलेल्या परवानगी विरोध, महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रातील जलविद्युत केंद्राचे पुनर्निर्माण करण्याच्या नावाखाली खाजगीकरण करण्याच्या धोरणाला संघर्ष समितीने तीव्र विरोध केला.

उपकार्यकारी अभियंता महेश धाडवे, दौंड शहर चे सहाय्यक अभियंता बशीर देसाई, दौंड उपविभागाचे कनिष्ठ अभियंता अमित धोत्रे, दौंड ग्रामीण विभागाचे सहाय्यक अभियंता जीवन ठोंबरे तसेच लाईनमन, कर्मचारी उपस्थित होते.