कामगारांना कामावरून काढणाऱ्या कंपनीविरोधात कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये धरणे आंदोलन

दौंड : कुरकुंभ एमआयडीसी येथिल एका कंपनी विरोधात मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या वतीने, संघटनेचे दौंड तालुका अध्यक्ष भारत सरोदे यांच्या नेतृत्वाखाली धरणे, निदर्शने आंदोलन करण्यात आले.

संबंधित कंपनीतून कोणतीही नोटीस न देता काही कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आले होते. कामगारांच्या व्यथा जाऊन घेतल्यानंतर हे आंदोलन करण्यात आले. कंपनीतून काढून टाकण्यात आलेल्या या कामगारांना त्वरित कामावर घेण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

या आहेत आंदोलकांच्या प्रमुख मागण्या

१) कंपणीने कामावरुन काढुन टाकलेल्या कामगारांना त्वरीत कामावर रुजु करून घ्यावे २) एक वर्ष काम करुनही कामगारांचा पीएफ, ईपीएफ कार्यालयाकडे जमा न करणाऱ्या तसेच १ महिना ओव्हर टाईम काम करणाऱ्या कामगारांना ओव्हर टाईम पगार न देणाऱ्या सदर कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी ३) कामगारांचा १ वर्षाचा पीएफ ताबडतोब कामगारांच्या खात्यावर जमा करावा.
४) एमआयडीसीतील प्रत्येक कंपनीमध्ये स्थानिक कामगारांचा कीती भरती कोटा आहे ? तो भरला जात नाही याची चौकशी करुन प्रत्येक कंपणीने कामगार कायद्यानुसार स्थानिक कामगारांचा कोटा भरावा.
५) महीला कामगार व पुरुष कामगारांना ओव्हर टाईम न केल्यास काही कंपणी व्यावस्थापनाकडुन कामावरुन काढुन टाकण्याची धमकी दिली जाते अशा धमकी देणाऱ्या कंपणी व्यावस्थापनावर कायदेशीर कारवाई करावी.
६) महीला कामगारांना रात्रीच्यावेळी ओव्हरटाईम काम करण्यास कोणत्याही कंपणीने सक्ती करु नये.
७) कामगारांच्या संरक्षण व आरोग्याची काळजी घेवुन कंपण्यांनी कामगारांना सर्व सुविधा पुरवाव्या. सदर कंपनीने व ईतर कंपण्यांनी कामगारांच्या मागण्या पुर्ण न केल्यास पुढील आंदोलन तिव्र करण्याचा ईशारा भारत सरोदे यांनी दिला आहे.

यावेळी कुरकुंभचे सर्कल व कंपनीचे मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले व जो पर्यंत कंपणी ठोस निर्णय घेणार नाही तोपर्यंत आंदोलन चालु राहील अशी भुमीका सर्व आंदोलकांनी घेतली होती. त्यामुळे कंपनी मॅनेजरने कंपनीच्या मालकाशी फोनवर चर्चा केल्यानंतर व कंपनी मालकाने आंदोलनकर्त्यांशी फोनवर समाधानकारण चर्चा केल्यांतर १५ दिवसात कंपनीचे प्रतीनिधी व आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईल असे लेखी पत्र कंपनीने दिले आहे.

या आंदोलनात मा.नगरसेवक नागसेन धेंडे, न्यू पॅंथर सेनेचे जयदीप बगाडे, आरपीआय दौंड तालुका ऊपाध्यक्ष नवनाथ, नरेश डाळिंबे श्रीकांत शिंदे, मोजेस पाॅल,सिद्धार्थ माशाळ, सुधीर वाघमारे, दिपक पवार, राजु गरुडकर, संजय जाधव, संदीप मोरे, नितेश परदेशी, आकाश गायकवाड, रत्नदिप गायकवाड, प्रतिक सरोदे, रिहुल नायडु, संदिप माने, शिवाजी खवळे, पदाधीकारी व कामगार ऊपस्थित होते.