आमदार रोहीत पवारांवरील ‘ईडी’ कारवाईचा दौंडमध्ये निषेध | आप्पासाहेब पवारांसह कार्यकर्त्यांकडून तहसीलदारांना निवेदन

दौंड : आमदार रोहीत पवार यांच्यावरील ईडी कारवाईचा दौंड तालुक्यातून निषेध करण्यात येत असून आज दौंड तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

आज दौंड तहसील कार्यालय येथे दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शहर (शरद पवार गट) यांच्या वतीने आमदार रोहीतद पवार यांच्यावर जाणूनबुजून व राजकीय सूडबुद्धीने केंद्र सरकारने ईडी यंत्रणेच्या माध्यमातून आकसाने तपास कारवाई करत असल्याचा आरोप करण्यात येऊन केंद्र सरकार व राज्यसरकार यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी तहसिलदार शेलार यांना दौंड तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार रोहीत पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ‘या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

या निवेदनावेळी राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, पुणे जिल्हा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सोहेलभ खान, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ टुले, अजित शितोळे, सचिन काळभोर, सचिन गायकवाड, सुहास वाघमारे, महेश ताकवले, श्रीकांत दोरगे, चैतन्य पाटोळे, किशोर टेकवडे, माऊली काळभोर, दिपक मारणे, महादेव सूर्यवंशी, सचिन नागवे, भाऊसाहेब फडके, संतोष जाधव, बी.बी.फडके, कल्याण पवार, बाबा दगडे, सत्यजित धुमाळ, मोहन घुले, अमित पवार, प्रकाश सोनवणे, महेश जगदाळे, विकास नांदखिले, उत्तम टेमगिरे, अनिता लोंढे, हर्षद पटेल, श्रेयस सोनवणे, अमोल पवार, सुनील पवार, सचिन पवार, सतीश पोंडकुले, पंढरीनाथ साबळे, दत्ता पवार, अमोल पवार, सोनू जाधव यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.