खडकी, दौंड : दौंड पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या खडकी येथे पुणे सोलापूर हायवे लगत असणारे हॉटेल आनंद लॉज अँड बार या ठिकाणी अवैधरित्या वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती दौंड पोलिसांना मिळाल्यानंतर बनावट ग्राहक द्वारे सदर ठिकाणी पोलिसांनी छापा मारला असता आनंद हॉटेल आणि बार या ठिकाणी आरोपी प्रभाकर गोपाळ शेट्टी व स्वप्नील संजय गुणवरे हे दोघे ग्राहकांकडून पैसे घेऊन वेश्याव्यवसाय करीत असताना पोलिसांना जागीच मिळून आले.
सदर छाप्यामध्ये एकूण आठ मुली व महिला मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन दौंड पोलीस स्टेशन येथे सदर आरोपी विरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस निरीक्षक महेश मेश्राम, पोलीस हवालदार संजय कोठावळे यांसह पोलीस पथकाने मिळून केली आहे